02 March 2021

News Flash

रेल्वेचे निमंत्रण उशिरा मिळाल्याने शिवसेना खासदार नाराज

वांद्रे टर्मिनस येथे आयोजित रेल्वेच्या कार्यक्रमाचे निमंत्रण उशिरा मिळाल्याने बुधवारी शिवसेना खासदार

वांद्रे टर्मिनस येथे आयोजित रेल्वेच्या कार्यक्रमाचे निमंत्रण उशिरा मिळाल्याने बुधवारी शिवसेना खासदार आणि कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे कार्यक्रम लांबणीवर पडला. मात्र अशातही भाजपा आमदार आशीष शेलार यांनी रेल्वे फलाटाचे आणि आरक्षण कार्यालयाचे उद्घाटन पार पाडल्याने शिवसेना भाजपामधील वादाचे रंग या कार्यक्रमावर पाहायला मिळाले. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या धर्तीवर राजकारण तापवले जात असल्याचा आरोप करण्यात आला.
वांद्रे टर्मिनस येथील फलाट आणि तिकीट आरक्षण कार्यालयाचे, कांदिवली स्थानकांतील स्वयंचलित जिन्याचे आणि गोरेगाव स्थानकांतील तीन स्वयंचलित जिन्याच्या कामांचे उद्घाटन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते दिल्लीतून व्हिडीओ कॉन्फरंन्सींगद्वारे करण्यात आले. या कार्यक्रमाचे निमंत्रण शिवसेना खासदारांना मंगळवारी रात्री उशिरा मिळाल्याने खासदार अरिवद सावंत यांनी नाराजी व्यक्त करत केली. यावेळी खासदार राजन विचारे देखील उपस्थित होते. दरम्यान रेल्वे अधिकाऱ्यांनी सावंत यांना व्यासपीठावर बोलावले असता त्यांनी व्यासपीठावर येण्यास नकार दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2016 12:21 am

Web Title: shiv sena mp upset on railway invitations
टॅग : Shiv Sena
Next Stories
1 अपघात झाल्यास आता गाडीच्या मालकावरही गुन्हा!
2 आर्थिक गुन्हे शाखा प्रमुखाच्या मुलाचा भूखंड घोटाळा
3 मुंबईतील चार उपायुक्तांसह राज्यातील ३२ अधीक्षकांच्या बदल्या
Just Now!
X