28 February 2021

News Flash

शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारला बेचिराख केल्याशिवाय राहणार नाही, शिवसेनेचा इशारा

सरकारची कर्जमुक्ती फसवी आहे

आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा लाँग मार्च सोमवारी पहाटेच्या सुमारास मुंबईतील आझाद मैदानावर दाखल झाला. भाजपा वगळता शिवसेनेसह सर्वच पक्षांनी शेतकऱ्यांच्या या मोर्चाला पाठिंबा दिला आहे.

आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा लाँग मार्च सोमवारी पहाटेच्या सुमारास मुंबईतील आझाद मैदानावर दाखल झाला. भाजपा वगळता शिवसेनेसह सर्वच पक्षांनी शेतकऱ्यांच्या या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. सरकारने अर्थसंकल्पात फसव्या घोषणा करून शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळले असून धुळ्याचे एक शेतकरी धर्मा पाटील मंत्रालयात आले व त्यांनी आत्महत्या केली. आता ‘जय किसान’चा नारा देत हजारो धर्मा पाटील मंत्रालयाच्या दिशेने निघाले आहेत. त्यांचा आक्रोश आणि वेदना सरकारला बेचिराख केल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. तसेच सरकार पोलीस यंत्रणेचा कठोर वापर करून शेतकऱ्यांना आझाद मैदान किंवा काळा घोड्याची वेसही ओलांडून देणार नाही. त्यांना रोखण्यासाठी लोखंडी जाळ्या, दंडुके, अश्रुधुराची नळकांडी याचा बंदोबस्त केला असून पोलिसांची कुमकही वाढवली अशी शंकाही उपस्थित केली.

शिवसेनेने ‘सामना’ या आपल्या मुखपत्रातून भाजपावर टीकास्त्र सोडले. मोर्चेकऱ्यांना भुलवण्यासाठी सरकार एखाद्या मंत्र्यास पाठवेल आणि खोटी आश्वासने देऊन शेतकऱ्यांचा जोष कमी करेल. पण हा शेतकरी आता कोणत्याही भूलथापांना बळी पडणार नसल्याचा विश्वासही व्यक्त केला. हा मोर्चा कोणत्या विचारांचा, संघटनेचा किंवा रंगाचा या चर्चेत पडायचे नसून तो शेतकरी आहे. त्याला जात, धर्म व राजकीय विचार नाही, असे म्हणत आम्ही त्यांचे मुंबई स्वागत करतो, अशी भूमिका सेनेने मांडली.

 

कम्युनिस्टांच्या मोर्चाला शिवसेनेने पाठिंबा दिल्यामुळे सध्या तो चर्चेचा विषय ठरला आहे. त्यावरही भाष्य करताना शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केली. मतभेद असले तरी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात लाल निशाण सक्रियपणे सहभागी होते, हे विसरता येणार नाही. सर्व राजकीय मतभेद दूर ठेवून आम्ही शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देत आहोत. शेतकरी पिचला आहे, रोज आत्महत्या करतो आहे. रोज नवे संकट त्यांच्यासमोर उभे ठाकत आहे. अशा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करा ही पहिली मागणी शिवसेनेची. त्यासाठी आम्ही रान पेटवले व सरकार गदागदा हलवले तेव्हा सरकारने कर्जमुक्तीची घोषणा केली, पण ही कर्जमुक्ती फसवी आहे. हजारो, लाखो शेतकरी कर्जमुक्तीच्या लाभापासून वंचित आहेत. कर्जमाफीतून शेतकऱ्यांच्या हाती फारसे काही लागले नाही व राजकीय लाभासाठी फक्त जाहिरातबाजी झाली. सरकारी धोरणे व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. सरकार फक्त तोंडाला पाने पुसत आहे. अर्थसंकल्पात शेतकऱयांच्या नावाने फक्त घोषणांची बोंब मारण्यात आली. ना कर्जमाफी ना नुकसान भरपाई. शेतकरी मोठ्य़ा संख्येने आत्महत्येच्या मार्गावरून निघाला आहे व त्याने क्रांतीची ठिणगीच टाकली आहे, असे म्हणत भाजपाला लक्ष्य केले.

यावेळी केंद्र सरकारवरही टीका करण्याची शेवसेनेने संधी सोडली नाही. महाराष्ट्राचे पाणी पद्धतशीरपणे गुजरातकडे वळवण्याचा घाट घातला जात आहे व दुसरीकडे बुलेट ट्रेनचा बुलडोझर शेतकऱ्यांच्या जमिनीवर फिरू लागला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या व गरजा फार नाहीत. त्यांना फक्त सुखाने जगण्याचे स्वातंत्र्य हवे आहे. नोटाबंदीच्या गळफासात त्याची मान आजही अडकलेली आहे. त्याचे अर्थकारण उद्ध्वस्त झाले आहे. महागाई वाढली आहे. डिझेल, पेट्रोलचे भाव रोज वाढत आहेत. त्यामुळे शेतकरी व कामगारांच्या जीवनाची राखरांगोळी होत चालली असल्याचा आरोप त्यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2018 8:49 am

Web Title: shiv sena party chief uddhav thackeray criticized on bjp state government cm devendra fadnavis on shetkari long march farmer march mumbai
Next Stories
1 Kisan Long March: शेतकऱ्यांचा मोर्चा यशस्वी, सरकारचे लेखी आश्वासन
2 माजी आमदारांना निवृत्तिवेतनात वाढ हवी!
3 समितीकडून रेल्वे बोर्डाकडे अहवाल सादर
Just Now!
X