लेखिका शोभा डे यांनी मुंबई संदर्भात ट्विटर वरून केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ शिवसैनिकांनी डे यांच्या घरासमोर गुरुवारी निदर्शने केली. यावेळी शिवसैनिकांनी डे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.
शिवसेना विभागप्रमुख दगडू सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली  १५० ते २०० शिवसैनिक डे यांच्या कफ परेड येथील मित्तल टॉवर इमारतीबाहेर जमले आणि त्यांनी जोरदार निदर्शने केली. त्यात महिला शिवसैनिकांचाही समावेश होता. शिवसैनिकांनी यावेळी डे यांच्या इमारतीतही घुसण्याचा प्रयत्न केला.आंदोलकांनी कफ परेड पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. डे यांनी आज हे बेजबाबदार विधान केले उद्या अजून लोक करतील त्यामुळे जोपर्यंत डे माफी मागत नाहीत तो पर्यंत आंदोलन सुरू राहील असे सकपाळ यांनी सांगितले