News Flash

सरनाईक यांच्या पत्रावर सेनेची सावध प्रतिक्रिया भाजपकडून स्वागत

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सच्च्या शिवसेना कार्यकर्त्यांची भावना पत्रातून व्यक्त केली आहे,

Pratap-Sarnaik
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक

सरकारला धोका नाही, काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका

मुंबई : शिवसेनने पुन्हा भाजपशी युती करावी या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटली असून, ही सच्च्या शिवसेना कार्यकर्त्यांची भावना असल्याचे मत भाजपने व्यक्त केले. महाविकास आघाडी सरकारला काही धोका नसल्याचे काँग्रेस व राष्ट्रवादीने स्पष्ट के ले तर  केंद्रीय तपास यंत्रणांच्या जाचामुळेच सरनाईक यांनी ही भावना व्यक्त केल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सच्च्या शिवसेना कार्यकर्त्यांची भावना पत्रातून व्यक्त केली आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.  काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरची  शिवसेनेची आघाडी ही अनैसर्गिक असल्याचे आम्ही गेले दीड वर्ष सांगत आहोत. काँग्रेसने  कायमच अल्पसंख्याकांचे लांगूलचालन केले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या पक्षांशी कायम संघर्ष केला व आता शिवसेना त्यांच्याबरोबरच सत्तेत आहे. उद्धव ठाकरे यांचा तयारी असल्यास आमचे केंद्रीय नेते युतीबाबत विचार करतील, असे विधानही पाटील यांनी केले.

सरनाईक यांचे पत्र हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला काहीही धोका नसल्याचे मत व्यक्त के ले. सरनाईक यांच्या पत्रामागील भावना काही वेगळी असावी. शिवसेनेतील नेते किं वा कार्यकर्ते मोठय़ा प्रमाणावर राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये प्रवेश के ल्याची उदाहरणे नाहीत, असेही जयंत पाटील म्हणाले.

शिवसेना प्रवक्ते , खासदार  संजय राऊत यांनी या पत्रावर काही प्रतिक्रिया देण्याची गरज नसल्याचे सांगितले. आपल्याला त्रास होत असल्याचे सरनाईक यांनी पत्रात नमूद केले असून तो कोणाचा आहे, हे महत्वाचे असल्याचे स्पष्ट केले.

मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणातील घोटाळ्यात प्रताप सरनाईक हे आरोपी आहेत. तुरुंगात जाण्याच्या भीतीमुळेच ते भाजपशी युती करावी असे बोलू लागल्याची खोचक प्रतिक्रि या भाजपचे किरीट सौमेय्या यांनी व्यक्त के ली.

भाजपशी पुन्हा युती  करावी- सरनाईकांचे पत्र

भाजपशी पुन्हा युती करावी, अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. काँग्रेसने स्वबळावर निवडणुका लढविणार असल्याचे ठरविले असून राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचेच नेते व कार्यकर्ते फोडत असल्याने आता भाजपशी जुळवून घ्यावे, असे मत सरनाईक यांनी व्यक्त केले आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी करोना काळात खंबीरपणे समर्थ नेतृत्व गेले दीड वर्षे दिले आहे. राजकारण बाजूला ठेवून मुख्य मंत्री काम करीत आहेत. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमुळे शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळाले, असे त्यांना वाटत आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री, नेते व सनदी अधिकारी हे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा टाळण्यासाठी छुपी हातमिळवणी करीत आहेत. शिवसेनेचा मुख्य मंत्री असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची कामे होत असून शिवसेनेच्या आमदारांची होत नाहीत. त्याबद्दल शिवसेना आमदारांमध्ये नाराजी असल्याकडे सरनाईक यांनी लक्ष वेधले आहे.

केंद्रीय तपास यंत्रणा आणि काही भाजप नेत्यांमुळे मला, अनिल परब, रवींद्र वायकर आदींना व त्यांच्या कुटुंबियांना गेले काही महिने कमालीचा त्रास होत असून बदनामीही होत आहे. या पत्रात त्यांनी भाजपचा माजी खासदार तपास यंत्रणांचा दलाल म्हणून काम करीत असल्याचे नमूद

के ले आहे.  आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच भेट घेऊन खासगीत चर्चाही केली आहे. पुढील वर्षी मुंबई, ठाणे व अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत. भाजप नेत्यांशी आपले जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ते अधिक तुटण्यापेक्षा पंतप्रधान मोदींशी व भाजपशी जुळवून घेतल्यास त्याचा माझ्यासह अन्य नेत्यांना आणि शिवसेनेलाही भविष्यात लाभच होईल, असे सरनाईक यांनी पत्रात म्हटले आहे.

सरनाईक यांच्या विरोधात गुन्हे दाखल

‘ टॉप्स कंपनी ‘ कडून करण्यात आलेल्या पैशांच्या फेराफे रीत अंमलबजावणी संचालनालयाने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल के ला असून त्यांची चौकशीही के ली आहे. मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या कं त्राटात झालेल्या गैरव्यवहारातही सरनाईक यांचे नाव आले होते. अंमलबजावणी संचालनालयाने सरनाईक यांच्या कं पनीशी संबंधित टिटवाळ्यातील ११२ भूखंडांवर जप्ती आणली. अलीकडेच त्यांच्या लोणावळ्यातील रिसोर्टवर धाडी टाकण्यात आल्या. सरनाईक यांच्या व्यवसायातील भागीदाराला अटक झाली होती. सुमारे पाच हजार कोटींपेक्षा अधिक घोटाळ्यात सरनाईक यांचा सहभाग असल्याचा आरोप भाजपचे किरीट सौमय्या यांनी के ला होता. केंद्रीय यंत्रणांनी सरनाईक यांच्या भोवताली फास आवळल्यानेच त्यांनी भाजपबरोबर जुळवून घेण्याची भूमिका घेतली का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2021 3:19 am

Web Title: shiv sena refuse to give reaction on pratap sarnaik s letter zws 70
Next Stories
1 एकाच कार्डवर मेट्रो, बेस्ट, मोनोतून प्रवास
2 रिक्षा-टॅक्सी परवाना वाटपावर मर्यादा?
3 कर्जासाठी बनावट आधार, पॅनकार्ड; ५ जण अटकेत
Just Now!
X