29 September 2020

News Flash

शिवसेनेच्या सूचना अमलात याव्यात : राठोड

भूमी अधिग्रहण विधेयकाच्या सध्याच्या मसुद्यास शिवसेनेचा विरोध कायम असून आम्ही सुचविलेल्या सुधारणा महाराष्ट्रात अमलात आल्या पाहिजेत, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल, असे

| April 23, 2015 03:38 am

भूमी अधिग्रहण विधेयकाच्या सध्याच्या मसुद्यास शिवसेनेचा विरोध कायम असून आम्ही सुचविलेल्या सुधारणा महाराष्ट्रात अमलात आल्या पाहिजेत, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल, असे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. सध्याच्या मसुद्यामध्ये जे पाच अपवाद करण्यात आले आहेत, ते जसेच्या तसे अमलात आणले, तर ८० टक्क्य़ांहून अधिक प्रकल्पांसाठी भूमी अधिग्रहण करता येईल. विकासाला आमचा विरोध नसून शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याचे राठोड यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारने काढलेल्या पहिल्या अध्यादेशानुसार राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी अधिसूचना जारी करून तो जसाच्या तसा अमलात आणला होता. त्यास शिवसेनेचा विरोध असल्याने महसूल राज्यमंत्री राठोड यांनी स्वाक्षरी केली नव्हती.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2015 3:38 am

Web Title: shiv sena sanjay rathod
टॅग Shiv Sena
Next Stories
1 व्हीआयपींना मुक्तद्वार, तर दारात तिष्ठते ‘आपले सरकार’
2 सावरकरांविषयीची कागदपत्रे पाहू देण्यास पोलिसांची टाळाटाळ
3 वेतनावरील खर्चाचा ताळेबंद मांडणार
Just Now!
X