21 March 2019

News Flash

भाजपने मुका घेतला तरी आता युती नाही!

भाजपने आता मुका घेतला तरी युती होणे शक्य नाही, अशी भूमिका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शनिवारी मांडली.

संग्रहित छायाचित्र

शिवसेना खासदार संजय राऊत यांची भूमिका

भाजपने आता मुका घेतला तरी युती होणे शक्य नाही, अशी भूमिका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शनिवारी मांडली. डोंबिवलीत ‘पै फ्रेण्ड्स लायब्ररी’तर्फे आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी युतीबाबत भाष्य केले.

‘‘राज्यात अस्थिरतेचे वातावरण नको म्हणून आम्ही सत्तेत आहोत. आम्ही सत्तेत वाटेकरी नव्हे तर टेकूधारी आहोत. मात्र, सत्तेमधून बाहेर पडण्यासाठी एक वेळ यावी लागते. ती अद्याप आलेली नाही,’’ असे राऊत यांनी सांगितले.

‘‘जनहिताची भूमिका घेऊन आम्ही सत्तेत असलो तरी सरकारविरोधी  आक्रमक भूमिका घेत आहोत. देशात सध्या धार्मिक, जातीय विषयांवरून निर्माण झालेले वातावरण भयावह आहे. असे वातावरण यापूर्वी काँग्रेसच्या राजवटीत नव्हते. या वातावरणात दुभंगणारी परिस्थिती निर्माण झाली आहे,’’ असे सांगत राऊत यांनी भाजपला लक्ष्य केले.

लोकसभा, विधानसभांचा कार्यकाळ आता पूर्ण होत आला आहे. कोणत्याही क्षणी निवडणुका होऊ शकतात. म्हणजे संपूर्ण सत्ता उपभोगून झाल्यानंतर सत्ता सोडणार का, या पत्रकारांच्या प्रश्नावर राऊत यांनी येत्या काळातच तुम्हाला त्याचे उत्तर मिळेल, असे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजकारण, देशातील अस्थिरता, शिवसेना-भाजप संबंध, उन्नाव, कथुआमधील घटनांवर राऊत यांनी कठोर शब्दांत भाष्य केले.

First Published on April 16, 2018 4:33 am

Web Title: shiv sena will not do alliance with bjp at any cost says mp sanjay raut