केंद्रीय अभ्यासक्रमाच्या आयजीसीएसई आणि आयबी या महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिली ते सातवीपर्यंत मराठी भाषा शिकवणे बंधनकारक करण्यात येणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या शाळांमध्ये शिकविण्यात येणार असून त्यासाठी विधिमंडळ सदस्यांचा ठराव या अधिवेशनात करण्यात येणार असून तो केंद्राकडे पाठविण्यात येईल, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.
राज्यातील शाळांमधील नर्सरी प्रवेशासाठी शासनाने धोरण आखण्याबाबतचा प्रश्न विधानसभेत यशोमती ठाकूर, अमिन पटेल, अस्लम शेख आदींनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला. त्याला उच्चर देताना त्यांनी ही माहिती दिली.