सहकारी चळवळीतील अग्रणी आणि मुंबै बँकेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव नलावडे यांनी मनसेला जय महाराष्ट्र करीत गुरुवारी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला.
शरद पवार यांच्याबरोबर १९८०च्या दशकात समाजवादी काँग्रेसमध्ये व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थापनेपासून काम केलेल्या नलावडे यांनी दोन वर्षांंपूर्वी मनसेमध्ये प्रवेश केला होता. मनसेकडून त्यांनी निवडणूकही लढविली, पण त्यांना यश मिळाले नव्हते. निवडून येण्याच्या आशेवर आपण मनसेत प्रवेश केला होता. आता पुन्हा राष्ट्रवादी काम करण्याचा निर्णय घेतल्याचे नलावडे यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर यांच्या उपस्थितीत नलावडे यांचा पक्ष प्रवेश झाला. नलावडे यांच्यावर पक्षात महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाईल, असे तटकरे यांनी जाहीर केले.