News Flash

नाटकाच्या टेम्पोला अपघात; एक ठार

पहाटे साडेपाच्या सुमारास एका कालव्यात टेम्पो कोसळला.

‘शिवाजीनगर अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाच्या टेम्पोला शनिवारी पहाटे माजलगाव-देवराई येथे अपघात झाला. या अपघातात टेम्पोतून प्रवास करणारे बॅकस्टेज आर्टिस्ट आनंद मोघे यांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. मोघे हे मुलुंड येथे राहात होते.

या नाटकाचा नांदेड येथे प्रयोग करुन सर्व जण निघाले होते. नाटकातील कलाकार गाडीने तर काही जण टेम्पोने निघाले. पहाटे साडेपाच्या सुमारास एका कालव्यात टेम्पो कोसळला. या अपघातात मोघे हे जागीच ठार झाले तर नाटकात ‘यम’ ही भूमिका करणारे प्रवीण डाळींबकर व टेम्पोचा चालक जखमी झाले.पहाटे साडेपाच्या सुमारास एका कालव्यात टेम्पो कोसळला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 13, 2016 2:30 am

Web Title: shivaji underground in bhimnagar mohalla met with accident
Next Stories
1 अल्पवयीन मुलीवरील अत्याचार, हत्येप्रकरणी दोघांना अटक
2 मेट्रोची कारशेड आरेमध्ये होणारच नाही; जावडेकरांच्या उपस्थितीत देसाईंचा इशारा
3 ‘आंदोलनाला स्थगिती दिली याचा अर्थ मी नरमलो असा नाही’
Just Now!
X