08 August 2020

News Flash

शिवसैनिक अरविंद भोसले यांना ‘सोन्याच्या चपला’ !

शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या नारायण राणे यांचा राजकीयदृष्टय़ा जोपर्यंत पराभव होत नाही तोपर्यंत ‘अनवाणी’ राहण्याची प्रतिज्ञा केलेल्या अरविंद भोसले या शिवसैनिकाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

| November 20, 2014 12:18 pm

शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या नारायण राणे यांचा राजकीयदृष्टय़ा जोपर्यंत पराभव होत नाही तोपर्यंत ‘अनवाणी’ राहण्याची प्रतिज्ञा केलेल्या अरविंद भोसले या शिवसैनिकाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी ‘सोन्याच्या चपला’ दिल्या जाणार आहेत. भोसले हे सिंधुदुर्ग संपर्कप्रमुख आणि वरळीचे विभागप्रमुख म्हणून काम पाहतात.
शनिवार, २२ नोव्हेंबर रोजी आरवली येथील वेतोबा मंदिरात होणाऱ्या एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भोसले यांना ‘सोन्याच्या चपला’ दिल्या जाणार आहेत. बृहन्मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर, ‘बेस्ट’ समितीचे अध्यक्ष अरुण दुदवडकर, आमदार वैभव नाईक आणि खासदार विनायक राऊत, तसेच मुंबई आणि सिंधुदुर्ग येथील शिवसैनिकांकडून या चपला भोसले यांना दिल्या जाणार आहेत.
शिवसेनेला रामराम केल्यानंतर राणे यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढविली आणि ते विजयी झाले. निवडणुकीत राणे यांचा जोपर्यंत पराभव होत नाही तोपर्यंत पायात चप्पल न घालण्याची प्रतिज्ञा भोसले यांनी २१ नोव्हेंबर २००५ मध्ये केली होती. त्यानुसार आत्तापर्यंत पायात चप्पल घातलेली नव्हती. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राणे पराभूत झाल्यानंतर भोसले यांनी पायात चपला घालायला सुरुवात केली. भोसले यांना शिवसैनिकांकडूनही हजारो चपलांचे जोड देण्यात आले. त्यांची संख्या सुमारे तेराशे इतकी होती. भोसले यांनी हे जोड कसारा, इगतपुरी, वाडा, जव्हार, मोखाडा येथील आदिवासींसाठी पाठवून दिले होते.

ज्या भावनेतून मला या ‘सुवर्ण पादुका’ दिल्या जाणार आहेत, ही बाब एक शिवसैनिक म्हणून माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. या ‘सुवर्ण पादुका’ मला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मिळणार असल्याने माझ्यासाठी हा भाग्याचा क्षण आहे. एका सामान्य शिवसैनिकाला यापेक्षा काय हवे?
अरविंद भोसले

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2014 12:18 pm

Web Title: shivsainik arvind bhosale honor with gold footwear
Next Stories
1 पूर्व मुक्त मार्गास सेनाप्रमुखांचे नाव देण्याची मागणी
2 डोंबिवलीत काँग्रेस नगरसेवकांचे राजीनामे
3 मुंबईची प्रवासकोंडी
Just Now!
X