लालबागचा राजा गणपती मंडळावर आयुक्तांनी धर्मादाय आयुक्तांनी निर्बंध लादले आहेत हा निर्णय चुकीचा आहे आणि एककल्ली आहे अशी टीका शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केला. निर्बंध घालणाऱ्या आयुक्तांचीच चौकशी करा अशीही मागणी शेवाळे यांनी केली आहे. त्यामुळे लालबागचा राजा मंडळवार घालण्यात आलेले निर्बंध शिवसेनेला चांगलेच झोंबल्याचे दिसून येते आहे. हिंदूंच्या सणांना आडकाठी करू नये, भाजपा सरकारने चालवलेले हे नसते उद्योग थांबवावेत असाही इशारा शेवाळे यांनी दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागचा राजा गणेश मंडळातील कार्यकर्त्यांची मुजोरी, व्हीव्हीआयपींची अरेरावी आणि त्यामुळे सर्वसामान्य भाविकांची होणार परवड हे रोखण्यासाठी धर्मादाय आयुक्तांनी पारदर्शक कारभारासाठी एक समिती नेमण्याचा निर्णय घेतला. धर्मादाय आयुक्तांनी लालबागचा राजा मंडळाच्या विरोधात आलेल्या तक्रारींची दखल घेत एकंदर परिस्थितीची पाहणी केली आणि त्यानंतर हा निर्णय घेतला. धर्मादाय आयुक्त जी समिती नेमतील ती समिती दर्शन रांगेबाबतचे धोरण ठरवणार आहे. तसंच लालबागच्या राजाच्या चरणी दान करणाऱ्या येणारे पैसे, सोन्या-चांदीच्या वस्तू आणि मौल्यवान वस्तू यांची मोजदादही धर्मदाय आयुक्तांच्या देखरेखीखाली करण्यात येईल असेही त्यांनी म्हटले.

मात्र धर्मादाय आयुक्तांनी घेतलेला हा निर्णय शिवसेनेला पटला नसल्याचे दिसून येते आहे. त्याचमुळे आक्रमक होत शिवसेना खासदार यांनी धर्मादाय आयुक्तांचीच चौकशी करा अशी मागणी केली आहे. इतकेच नाही तर भाजपाने हे नसते उद्योग थांबवावे अशीही टीका राहुल शेवाळे यांनी केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena aggressive against decision taken by charity commissioner about lalbagcha raja mandal
First published on: 16-10-2018 at 20:13 IST