20 September 2018

News Flash

नारायण राणेंच्या राज्यसभा उमेदवारीला शिवसेनेचा विरोध

नारायण राणेंना राज्यसभेची उमेदवारी दिलीच कशी?

नारायण राणे यांना भाजपाने राज्यसभेची उमेदवारी दिली खरी मात्र शिवसेना त्यांच्या या वाटेत काटे पसरवण्यासाठी सज्ज झाल्याचेच दिसून येते आहे. कारण भाजपाच्या महाराष्ट्र कोट्यातून नारायण राणे यांनी राज्यसभेसाठी अर्ज भरला आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष असलेले नारायण राणे यांनी भाजपाचे सदस्यत्त्व कधी घेतले? असा प्रश्न आणि यासारखे अनेक प्रश्न उपस्थित करत अनिल परब यांनी भाजपाला अडचणीत टाकणारे प्रश्न विचारले आहेत. त्यामुळे नारायण राणेंना भाजपाकडून मिळालेली राज्यसभेची उमेदवारी त्यांच्यासाठी अडचणीचीच ठरणार की काय? असा प्रश्न पडतो आहे.

HOT DEALS
  • Moto G6 Deep Indigo (64 GB)
    ₹ 15694 MRP ₹ 19999 -22%
  • Honor 9I 64GB Blue
    ₹ 14784 MRP ₹ 19990 -26%
    ₹2000 Cashback

अनिल परब यांनी यांनी भाजपाला विचारलेले प्रश्न

१) नारायण राणे यांनी कोणत्या पक्षाकडून राज्यसभेसाठी अर्ज भरला?
२) नारायण राणे यांनी भाजपाकडून अर्ज भरला असेल तर त्यांनी भाजपाचे सदस्यत्त्व कधी स्वीकारले?
३) नारायण राणेंनी भाजपाचे सदस्यत्त्व स्वीकारले असेल तर त्याची काही पावती? इमेल आहे का?
४) जर नारायण राणेंनी भाजपाचे सदस्यत्त्व स्वीकारले असेल तर त्यांनी स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिला का?
५) कारण एका पक्षाचा अध्यक्ष दुसऱ्या पक्षाचा सदस्य होऊ शकत होऊ शकत नाही आणि दुसऱ्या पक्षाच्या अध्यक्षाला एखाद्या पक्षाला उमेदवारी द्यायची असेल तर त्याला आधी पक्षाचा अधिकृत सदस्य करून घ्यावे लागेल तरच त्याला पक्ष बी फॉर्म देऊ शकतो असा नियम आहे
६) नारायण राणे यांना भाजपाने सदस्यत्त्व कधी दिले?
७) जर भाजपाने राणेंना सदस्यत्त्व दिले नसेल तर राज्यसभेची उमेदवारी कशी दिली?

शिवसेनेने उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे नारायण राणेंची उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नारायण राणे हे काँग्रेसमध्ये नाराज झाले होते त्यामुळे त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. मात्र भाजपाने त्यांना पक्षात प्रवेश दिला नाही. त्यानंतर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि त्यानंतर भाजपा त्यांना मंत्रिमंडळात स्थान देणार अशाही चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर नारायण राणेंना भाजपाने राज्यसभेवर पाठवण्याचा पर्याय निवडला. मात्र नारायण राणेंबाबत शिवसेनेने भाजपाला विचारलेल्या प्रश्नांमुळे त्यांची राज्यसभेची उमेदवारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

 

First Published on March 13, 2018 11:27 pm

Web Title: shivsena anil parab raise question about narayan ranes rajyasabha nomination