27 February 2021

News Flash

शिवसेना शाखाप्रमुखाचा मुलगा निघाला मोबाइल चोर, स्थानिकांनी दिला चोप

विनायकने ५० मोबाइल आणि सोनसाखळी चोरल्याचे कबूल केले आहे

( संग्रहीत छायाचित्र )

अंधेरी पूर्व येथील वॉर्ड क्रमांक ८० च्या शिवसेना शाखाप्रमुख कविता पांचाळ यांचा मुलगा विनायक याला तेथील स्थानिकांनी चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्याही स्वाधीन केलं. विनायकविरोधात ५० पेक्षा जास्त मोबाइल चोरी आणि सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल आहेत अशीही माहिती समजते आहे.

कविता पांचाळ यांच्या मुलाला म्हणजेच विनायकला अंमली पदार्थांचे व्यसन आहे. विनायक चोऱ्या करुन गांजा आणि ड्रग्ज घेतो. व्यसनासाठी तो चोरलेले मोबाइल आणि सोनसाखळ्या विकतो अशी माहिती अंधेरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद पवार यांनी दिली. आजच त्याला एकाचा मोबाइल चोरताना स्थानिकांनी पाहिले. त्यानंतर त्याला चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या हवाली करण्यात आले. विनायकने ५० पेक्षा जास्त मोबाइल आणि सोनसाखळ्या चोरल्याचे गुन्हे कबूल केले आहेत. विनायकला अटक करण्यात आली असून त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे असेही पवार यांनी स्पष्ट केले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2019 8:16 pm

Web Title: shivsena branch heads son theft mobile and chains local residents beaten him
Next Stories
1 डान्सबार बंदी उठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलं ‘डील’ -नवाब मलिक
2 रेल्वे स्टेशनवर आता तिकीट मशीनबरोबरच पिझ्झा मशीनही
3 शशांक राव यांनी फक्त माथी भडकवण्याचं काम केले; शिवसेनेचा पलटवार
Just Now!
X