News Flash

अरबी समुद्रातल्या प्रस्तावित शिवस्मारकाबद्दल उद्धव ठाकरे म्हणतात….

अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच भव्य स्मारक बांधलं जाणार आहे त्यावर शिवसेनेची भूमिका काय ? या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले कि, मी स्मारकाच्या जलपूजनाला गेलो

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (संग्रहित छायाचित्र)

अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच भव्य स्मारक बांधलं जाणार आहे त्यावर शिवसेनेची भूमिका काय ? या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले कि, मी स्मारकाच्या जलपूजनाला गेलो होतो. शिवस्मारकावर मतमतांतर असू शकतात. स्मारक कसली बांधताय त्यापेक्षा हे करा, ते करा. माझ म्हणणं आहे कि, शिवरायांसाठी जे जे करता येण शक्य आहे ते ते सर्व करा. शिवराय नसते तर आज आपण कुठे असतो, आपल अस्तित्व काय असतं ?

त्यामुळे अभिमानाने छाती फुलून येईल, मान उंच करुन पाहता येईल असं भव्य स्मारक बांधलं पाहिजे असे उद्धव म्हणाले. सध्या शिवरायांच्या पुतळयाच्या उंचीवरुन वाद सुरु आहेत. पुतळयाची उंची कमी करण्याचे प्रयत्न का सुरु आहेत? या संजय राऊत यांच्या प्रश्नावर उद्धव यांनी त्या उंचीच नेतृत्व नाहीय असे उत्तर देत अप्रत्यक्षपणे मोदी आणि फडणवीसांवर टीका केली.

शिवस्मारकाच्या जलपूजानाला मी मोदी आणि फडणवीस यांच्या बरोबर गेलो होतो पण शिवस्मारकाबद्दल आपल्या बरोबर कुठलीही चर्चा होत नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले. शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक झालेच पाहिजे पण गड-किल्ल्यांकडे दुर्लक्ष होता कामा नये असे उद्धव म्हणाले. गड-किल्ल्यांच्या देखभालीचे अधिकार दिल्लीतल्या पुरातत्व खात्याकडे आहे. त्यांचा शिवरायांच्या इतिहासाशी काय संबंध? गड-किल्ल्यांच्या संवर्धनाचे अधिकार राज्याला मिळाले पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे. शिवराय नसते तर संपूर्ण देशच हिरवा झाला असता असे उद्धव ठाकरे म्हणाले.

गायीची रक्षा करताना हिंदुस्थान स्त्रियांसाठी सर्वात असुरक्षित देश 

गायी कापा असं कधीच म्हणणार नाही. पण गायींची रक्षा करताना हिंदुस्थान  आज स्त्रियांसाठी सर्वात असुरक्षित देश बनला आहे याची लाज वाटते अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका केली. शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावर बोलताना मोदी सरकारला चपराक लगावली.

गेल्या तीन वर्षात या देशात हिंदुत्वाच्या नावावर उन्माद सुरु आहे ते हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे का ? या प्रश्नावर बोलताना त्यांनी कथित गोरक्षकांवर सडकून टीका केली. गोमाता वाचली पाहिजे पण मातेचं काय ? महिलांना न वाचवता तुम्ही गाईचं मांस खाल्लं का, याच्यामागे लागणार असाल, तर हे सगळं थोतांड आहे. हे हिंदुत्व नाही अशी घणाघाती टीका उद्धव यांनी केली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2018 9:01 am

Web Title: shivsena chief uddhav thackray view on shivsmarak
टॅग : Bjp
Next Stories
1 सत्तेत असूनही विरोधकांचं काम शिवसेना का करते? वाचा उद्धव ठाकरेंच्या मॅरेथॉन मुलाखतीतील ठळक मुद्दे
2 गायीची रक्षा करताना हिंदुस्थान स्त्रियांसाठी सर्वात असुरक्षित देश बनलाय- उद्धव ठाकरे
3 टाळ-मृदंगाच्या गजरात पंढरी दुमदुमली, मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी विठ्ठलपूजा
Just Now!
X