01 March 2021

News Flash

मनसे पदाधिकाऱ्यावर हल्ला, शिवसेना नगरसेवकला अटक

आपल्या कामात नाक खुपसल्याचा राग ठेवून हल्ला

प्रतिनिधिक छायाचित्र

मनसे पदाधिकाऱ्यावर हल्ला केल्याप्रकरणी शिवसेना नगरसेवकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नवी मुंबईतील शिवसेना नगरसेवक राजू कांबळे यांना रविवारी रबाले पोलिसांनी अटक केली आहे. ऐरोलीमधील मनसे विभाग अध्यक्ष विश्वनाथ दळवी यांच्यावर राजू कांबळे यांनी जोडीदाराच्या मदतीने लोखंडी रॉडने हल्ला केला होता. या हल्ल्यात दळवी गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. कुटुंबियांनी पोलिसात तक्रार केली आहे.

ऐरोली गावात नगरसेवक राजू कांबळे यांच्या वॉर्डात गटाराचे काम सुरु होते. कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा आक्षेप विश्वनाथ दळवी यांनी घेतला होता. आपल्या कामात नाक खुपसल्याचा राग ठेवून दळवींवर कांबळेंनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2018 9:40 pm

Web Title: shivsena corporator arrested for attack on mns official
Next Stories
1 ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ विशेष लोकल
2 पश्चिम रेल्वेवर आज ब्लॉक
3 मुंबईतील आग दुर्घटनांची न्यायालयीन चौकशी करा
Just Now!
X