News Flash

छोटू माळी हत्येप्रकरणी शिवसेनेच्या नगरसेवकाला अटक

ऐरोली सेक्टर तीन येथील गुंड छोटू माळी याच्या हत्या प्रकरणात शिवसेनेचे नगरसवेक मनोज हळदणकर यांना सोमवारी रबाले पोलिसांनी अटक केली.

| August 6, 2013 03:36 am

ऐरोली सेक्टर तीन येथील गुंड छोटू माळी याच्या हत्या प्रकरणात शिवसेनेचे नगरसवेक मनोज हळदणकर यांना सोमवारी रबाले पोलिसांनी अटक केली. त्यामुळे परिसरात खळबळ माजली असून हळदणकर समर्थकांनी मंगळवारी ऐरोलीत बंद पुकारला आहे.
ऐरोली येथील गुंड छोटू माळी याची २० जुलै रोजी सेक्टर तीन येथील ममता हॉटेलसमोर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी प्रमोद देशमुख, कुमार मूर्ती, उदय सनप, शिवराज सनप आणि मनीष सनप यांना अटक केली. ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याचा पोलिसांचा संशय होता.  माळी याच्या पत्नीनेही हळदणकर यांच्यावर आरोप केला होता. या पाश्र्वभूमीवर सोमवारी पोलिसांनी हळदणकर यांना अटक केली.  हळदणकर यांना सोमवारी सीबीडी सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना ९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. मंगळवारी शिवसेनेने बंद पुकारला आहे, पण हा नागरिकांनी बंद जाहीर केल्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी सांगितले. या प्रकरणात पोलिसांनी हळदणकर यांना नाहक गुंतवले असून आपण यासंदर्भात बुधवारी गौप्यस्फोट करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ऐरोलीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची हत्या 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2013 3:36 am

Web Title: shivsena corporator manoj haldankar arrested in chhotu mali murder case
Next Stories
1 ऑलिंपियाडवर भारतीय विद्यार्थ्यांची मोहोर
2 भ्रष्टाचाऱ्यांचा सहकार प्रवेश रोखण्याच्या प्रयत्नांना खीळ
3 घंटागाडीची घणघण सुरू ; ठाण्यातील संपात फूट
Just Now!
X