News Flash

VIDEO: शिवसेना नगरसेवकाची कोंबडी विक्रेत्यांना जबर मारहाण

माहीम मच्छिमार कॉलनी येथे ही मारहाण करण्यात आली

शिवसेनेचे नगरसेवक मिलिंद वैद्य यांनी कोंबडी विक्रेत्यांना जबर मारहाण केली आहे. माहीम मच्छिमार कॉलनी येथे ही मारहाण करण्यात आली. कोंबडी विक्रेत्यांनी आपल्या गाड्या परिसरात उभ्या केल्याने वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याच्या रागातून मिलिंद वैद्य यांनी ही मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ समोर आला असून चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हिडीओत मिलिंद वैद्य यांच्यासहित एक कार्यकर्ता कोंबडी विक्रेत्यांना मारहाण करत असल्याचं दिसत आहे. माहीम रेल्वे स्थानकाजवळ कोंबडी विक्रेत्यांनी आपले टेम्पो पार्क केले होते. व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे मिलिंद वैद्य आपल्या समर्थकांसह तिथे येऊन थेट मारहाण करण्यास सुरुवात करतात. किती वेळा सांगितलं आहे अशी विचारणा करत ते कोंबडी विक्रेत्याला माराहण करताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी टेम्पोला अडकवलेल्या वजनकाट्याची तोडफोडही केली. तसंच मारहाण करताना शिवीगाळदेखील करण्यात आली.

“गेल्या अनेक दिवसांपासून परिसरातील नागरिकांना कोंबडी विक्रेत्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. एकाच वेळी अनेक गाड्या उभ्या केल्याने या परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होते. तसंच कोंबड्यांची विष्ठा आणि पिसे यामुळेही घाण आणि कचरा निर्माण होतो”, असं स्पष्टीकरण मिलिंद वैद्य यांनी दिलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2019 5:56 pm

Web Title: shivsena corporator milind vaidya assaulted chicken traders mahim sgy 87
Next Stories
1 Budget 2019: केंद्रीय अर्थसंकल्प मोदी सरकारच्या स्वप्नांचा जाहीरनामा – मुख्यमंत्री
2 मुंबई तुंबली तेव्हा तुम्ही कुठे होता? राहुल गांधी काँग्रेस नेत्यांवर संतापले
3 औषधनिर्माणशास्त्राचे ७० टक्के पदवीधर बेरोजगार
Just Now!
X