16 January 2018

News Flash

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ताजी नलावडे यांचे निधन

गुरुवारी रात्री दीड वाजता त्यांची प्राणज्योत मालवल्याचे पक्षाच्या नेत्या नीलम गो-हे यांनी सांगितले.

मुंबई | Updated: February 15, 2013 10:27 AM

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ताजी नलावडे (७७) यांचे शुक्रवारी प्रदीर्घ आजाराने मुंबईत निधन झाले. फुफ्फुसाचा संसर्ग झाल्याने नलावडे यांना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी रात्री दीड वाजता तिथेच त्यांची प्राणज्योत मालवल्याचे पक्षाच्या नेत्या नीलम गो-हे यांनी सांगितले. नलावडे यांच्यामागे तीन मुली आहेत. 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेतील दुसऱया फळीमध्ये नलावडे महत्त्वाचे नेते होते. बाळासाहेब ठाकरे यांनी एकदा नलावडे यांचा उल्लेख पक्षाचा महत्त्वाचा आधारस्तंभ असे केले होते. नलावडे यांनी १९८६ मध्ये मुंबईचे महापौरपद भूषविले होते. चारवेळा विधानसभेचे सदस्य राहिलेले नलावडे शिवसेना व भाजप युती सरकारच्या काळात १९९५ ते ९९ मध्ये विधानसभेचे अध्यक्ष होते. नलावडे यांच्यावर वरळीमध्ये दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

First Published on February 15, 2013 10:27 am

Web Title: shivsena leader dattaji nalawade passes away
  1. No Comments.