25 November 2020

News Flash

आमदार बाळा सावंत यांचे निधन

वांद्रे पूर्व मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार प्रकाश ऊर्फ बाळा सावंत यांचे येथील हिंदूुजा रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले.

| January 10, 2015 02:00 am

वांद्रे पूर्व मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार प्रकाश ऊर्फ बाळा सावंत यांचे येथील हिंदूुजा रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा आजार बळावला होता. गुरुवारी मध्यरात्रीनंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून २००९ मध्ये पहिल्यांदा निवडून आलेले बाळा सावंत यांच्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विशेष लोभ होता. गेल्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या उमेदवारास पराभूत करून दुसऱ्यांदा विधानसभेची आमदारकी मिळविली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2015 2:00 am

Web Title: shivsena mla bala sawant passed away
टॅग Maharashtra,Mla
Next Stories
1 फोटो गॅलरी : राष्ट्रपित्याची भारतात परतण्याची शतकपूर्ती
2 व्यापारीही आडतीच्या अडकित्त्यात
3 अर्धवट आणि धोकादायक मार्गातही टोलमारी!
Just Now!
X