बिहारमधील राजकारणावरून शिवसेनेने सोमवारी आपला मित्रपक्ष भाजपवर निशाणा साधला. भाजप बिहारचे मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांना नितीशकुमार यांच्या विरोधात खेळवत आहे, असा आरोप शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखामधून करण्यात आला आहे. मांझी यांना समर्थन देणे म्हणजे राजकारणातील काळ्या पर्वाची बाजू घेणे, अशीही टीका करण्यात आली आहे.
केजरीवाल जिंकले; मग हरले कोण?; सेनेचा भाजपला खोचक सवाल
या अग्रलेखामध्ये लिहिण्यात आले आहे की, मांझी यांच्या डोक्यात इतकी हवा गेली की, त्यांनी अनेकदा भ्रष्टाचाराचे खुले समर्थन केले. हे त्यांच्या अज्ञानातून झाले असे म्हटले तरी त्याची किंमत राज्याला चुकवावी लागते. मांझी यांनी राजीनामा देण्याचा पक्षादेश जुमानला नाही. १३० आमदारांचे पाठबळ नितीशकुमारांच्या पाठीशी असतानाही ‘भाजप’च्या पाठिंब्यावर बहुमत जिंकण्याची धडपड ते करीत आहेत. भाजप मांझी यांना नितीशकुमार यांच्या विरोधात खेळवत आहे व हा खेळ विधानसभेत बहुमताच्या वेळी संपेल, पण ‘मांझी’ यांना समर्थन देणे म्हणजे राजकारणातील काळ्या पर्वाची बाजू घेणे होय.
विदर्भातील शेतकरी आत्महत्येवरून शिवसेनेचा भाजपवर हल्ला
गेल्याच आठवड्यात ‘सामना’तील अग्रलेखामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधण्यात आला होता. दिल्लीत भाजपच्या पराभवानंतर शिवसेनेने भाजपला खडेबोल सुनावले होता.