19 September 2020

News Flash

“माझी मुलाखत सुरु असतानाच सरकार पाडा”, उद्धव ठाकरेंचं आव्हान

"महाराष्ट्रात तीन चाकी सरकार, मग केंद्रात किती चाकी आहे?," उद्धव ठाकरेंची अनलॉक मुलाखत

संग्रहित

माझी मुलाखत सुरु असतानाच सरकार पाडा असं आव्हानच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. महाराष्ट्रात तीन चाकी सरकार, मग केंद्रात किती चाकी आहे? अशी विचारणादेखील त्यांनी केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली असून यावेळी उद्धव ठाकरेंनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. या मुलाखतीची सध्या उत्सुकता आहे. मुलाखतीपूर्वी संजय राऊत ट्विटरला प्रोमो शेअर करत ही उत्सुकता वाढवताना दिसत आहे. दरम्यान संजय राऊत यांनी मुलाखतीचा तिसरा प्रोमो शेअर केला आहे.

संजय राऊत यांनी शेअर केलेल्या नवीन प्रोमोमध्ये उद्धव ठाकरे महाविकास आघाडीला तीन चाकी सरकार म्हणत टीका करणाऱ्या विरोधकांना उत्तर देताना दिसत आहेत. तसंच राष्ट्रीय राजकारणावर भाष्य करताना, “आत्ता तुम्हाला चीन नको आहे, पण कालांतराने हिंदी-चिनी भाई भाई होणार नाही का?,” असा सवाल विचारत आहेत. यावेळी त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदावर बोलताना, “साठाव्या वर्षी मी मुख्यमंत्री असलो तरी याच’साठी’ केला होता अट्टहास असं नाही आहे..हा योगायोग आहे,” असं सांगितलं आहे.

संजय राऊत यांनी घेतलेली ही मुलाखत २५ आणि २६ जुलै अशा दोन भागांमध्ये प्रसिद्ध होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2020 9:01 am

Web Title: shivsena sanjay raut interview of maharashtra cm uddhav thackeray sgy 87
Next Stories
1 आरोग्यावर चार महिन्यांत ६५० कोटी खर्च
2 मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट
3 ‘रक्तद्रव’दानासाठी धारावीकरांचा पुढाकार
Just Now!
X