News Flash

उर्मिला मातोंडकरच्या शिवसेना प्रवेशासंबंधी संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; म्हणाले…

उर्मिला मातोंडकर शिवसैनिकच...

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताला शिवेसना खासदार संजय राऊत यांनी दुजोरा दिला असून शिक्कामोर्तब केलं आहे. तसंच उर्मिला मातोंडकर उद्या म्हणजेच बुधवारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. “त्या शिवसैनिकच आहेत. बहुतेक उद्या प्रवेश करतील. त्यांच्यामुळे महिला आघाडी मजबूत होईल,” असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये सातत्याने धुसफुस सुरू असतानाच विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी १२ नावांची यादी महाविकास आघाडी सरकारच्यावतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपवण्यात आली होती. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार १२ नावांची यादी बंद पाकिटात राज्यपालांना सादर करण्यात आली. यांपैकी एका जागेसाठी शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांचं नाव देण्यात आलं आहे.

उर्मिला मातोंडकर यांनी २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर मुंबई उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना भाजपाच्या गोपाळ शेट्टींकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. निवडणुकीनंतर त्यांनी आपल्या काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामाही दिला होता. दरम्यान, राजकारणातून दूर राहिल्यानंतर वर्षभरानंतर त्या पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होणार असल्याचं दिसत आहे.

आणखी वाचा- …म्हणूनच उद्धव ठाकरेंनी माझी नियुक्ती केली आहे, संजय राऊतांनी दिलं उत्तर

दरम्यान संजय राऊत यांनी यावेळी चंद्रकांत पाटलांच्या टीकेला उत्तर दिलं. चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांचं नाव घेतलं की कानाला त्रास होतो अशी टीका केली आहे. त्याला उत्तर देताना ते म्हणाले की, “चांगली गोष्ट आहे. कानाला, पोटाला, डोळ्याला, ह्रदयाला त्रास झालाच पाहिजे. म्हणूनच माझी नेमणूक उद्धव ठाकरेंनी केली आहे”.

आणखी वाचा- शेतकरी काय दहशतवादी आहेत का? संजय राऊत मोदी सरकारवर संतापले…

केंद्राच्या नव्या शेतकी कायद्यांच्या विरोधातील आंदोलन शेतकऱ्यांनी सुरुच ठेवलं आहे. यावरुन संजय राऊत यांनी टीका केली असून शेतकरी काय दहशतवादी आहेत का? अशी विचारणा केली आहे. “जो शेतकरी तुमचा अन्नदाता आहे त्याला तुम्ही दहशतवादी, देशद्रोही म्हणत आहात. पंजाब, हरियाणामधील शेतकरी महाराष्ट्राप्रमाणे आहे. हा देश सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी ज्यांनी प्रयत्न केला, जी प्रमुख राज्यं आहेत त्यामध्ये महाराष्ट्र, पंजाब आणि हरियाणाचा समावेश आहे. शेतकरी काय दहशतवादी आहेत का?,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2020 12:58 pm

Web Title: shivsena sanjay raut on actress urmila matondkar joining party sgy 87
Next Stories
1 …म्हणूनच उद्धव ठाकरेंनी माझी नियुक्ती केली आहे, संजय राऊतांनी दिलं उत्तर
2 शेतकरी काय दहशतवादी आहेत का? संजय राऊत मोदी सरकारवर संतापले…
3 अभिनेत्रीला लग्नाचं आमिष दाखवून दोन वर्ष केला बलात्कार, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
Just Now!
X