News Flash

“…हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा,” कंगनाच्या आव्हानाला संजय राऊतांचं प्रत्युत्तर

कोणाच्या बापामध्ये हिंमत असेल तर मुंबईत येण्यापासून रोखून दाखवण्याचं कंगनाचं आव्हान

मुंबई ही मराठी माणसाच्या बापचीच आहे. ज्यांना मान्य नाही त्यांनी त्यांचा बाप दाखवावा असं ट्विट करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे अभिनेत्री कंगना रणौतवर निशाणा साधला आहे. मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीर वाटत असल्याचं वक्तव्य केल्यानंतर कंगना रणौतवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. कंगनाने यावर ट्विट करत आपल्याला मुंबईत येण्यावरुन धमक्या मिळत असून ९ सप्टेंबरला मुंबईत येत आहे. कोणाच्या बापामध्ये हिंमत असेल तर रोखून दाखवा असं थेट आव्हान दिलं आहे.

संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे. ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा. शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही. प्रॉमिस. जय हिंद, जय महाराष्ट्र”

आणखी वाचा- “मी अ‍ॅक्शनवाला माणूस आहे,” कंगनाच्या धमकीच्या आरोपांवर संजय राऊतांचं प्रत्युत्तर

आणखी वाचा- ९ सप्टेंबरला मुंबईत येतेय कोणाच्या बापाची हिंमत असेल तर थांबवून दाखवा – कंगना रणौत

कंगनाने ट्विटमध्ये काय म्हटलं आहे?
‘बरेच लोकं मला मुंबईत परत येऊ नकोस अशी धमकी देत आहेत. म्हणून मी येत्या आठवड्यात ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हा मी मुंबई विमानतळावर उतरेन तेव्हा पोस्ट करेन. कोणाच्या बापाची हिंमत असेल तर रोखून दाखवा’ असं ट्विट कंगनाने केलं आहे.

दरम्यान संजय राऊत यांनी याआधी प्रसारमाध्यमांशी बोलताना गृहमंत्र्यांकडे कारवाईची मागणी केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, “पाकिस्तानव्याप्त काश्मीर म्हणणं हा मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान आहे. ही मुंबईत १०६ हुतात्म्यांनी मिळवली आहे. मुंबईचं रक्षण सातत्याने आपल्या पोलिसांनी केलं आहे. २६/११ चा दहशतवादी हल्ल्यात मुंबई पोलीस शहीद झाले. कसाबला मुंबई पोलिसांनी पकडलं. १९९२ च्या दंगलीत मुंबईचे पोलीस शहीद झाले. मुंबई पोलिसांनीच लोकांना वाचवलं. अशा मुंबई पोलिसांवर कोणतेही ऐरेगेरै लोक ज्यांचा मुंबईशी संबंध नाही अशी वक्तव्यं करत असतील तर राज्य सरकारनं, गृहमंत्रालयानं कठोर कारवाई केली पाहिजे”. हे मुंबई पोलिसांचं मनोधैर्य खच्चीकरण करण्याच मोठं कारस्थान दिसत आहे असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2020 4:37 pm

Web Title: shivsena sanjay raut on bollywood actress kangana ranaut sgy 87
Next Stories
1 कंगनाच्या पाठीमागे राहून वार करण्याची गरज नाही, आशिष शेलारांची संजय राऊतांवर टीका
2 गंभीर आजाराच्या रुग्णांना रेल्वे प्रवासाची परवानगी द्या, अमित ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
3 तुम्हाला पाकड्यांनी मतदान केलं आहे का? संजय राऊतांचा कंगनाला समर्थन करणाऱ्या नेत्यांना सवाल
Just Now!
X