News Flash

खाट कितीही कुरकुरली तरी राहुल गांधींसारखे मेकॅनिक दिल्लीत बसले आहेत – संजय राऊत

महाविकास आघाडीत नाराजी नाट्य नसल्याचा संजय राऊत यांना विश्वास

खाट कितीही कुरकुरली तरी राहुल गांधींसारखे मेकॅनिक दिल्लीत बसले आहेत असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसेनेने सामना संपादकीयमधून टीका करताना जुनी खाट अधुनमधून जास्त कुरकुरते असा टोला लगावला आहे. त्यावरुन काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी असून यामुळे महाविकासआघाडी सरकारमध्ये नाराजी नाट्य रंगलं आहे. संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना नाराजी नाट्य आहे असं आपल्याला वाटत नसल्याचं म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

आणखी वाचा- राऊतांनी लिहिलेला अग्रलेख अपूर्ण माहितीच्या आधारावर; थोरातांचं प्रत्युत्तर

“सामनाचा एक स्वभाव आहे. एखादी गोष्ट आमच्या पद्धतीने अधिक सोपी करुन सांगतो. चांगली उदाहरणं देतो. काँग्रेस पक्ष देशातील सर्वात जुना आणि राजकारणात मुरलेला पक्ष आहे. खाट जुनी असली की ती जास्त कुरकुरते कारण त्यांना त्यांच्या परंपरेच्या, आपल्या नेतृत्त्वाच्या जुन्या आठवणी जाग्या होतात. मग ते बोलायला लागतात,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- काँग्रेस-शिवसेनेअंतर्गत कुरबुरी? संजय राऊत म्हणतात; …तर अशोक चव्हाणांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “‘खाट कितीही कुरकुरली तरी राहुल गांधी यांच्यासारखे मेकॅनिक दिल्लीमध्ये बसले आहेत मेन्टेन्स करायला, रिपेअर करायला. ते चांगले नेते आहेत”. संजय राऊत यांनी यावेळी महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष टिकणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. “सरकार पाच वर्ष चालावं ही सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार आणि शिवसेना या सर्वांची ठाम भूमिका आहे,” असंही ते म्हणाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2020 3:03 pm

Web Title: shivsena sanjay raut on congress rahul gandhi mahavikas aghadi government sgy 87
Next Stories
1 मुंबई एअरपोर्टवरुन विमान उड्डाणांची संख्या दुप्पट, आजपासून सुरूवात
2 मुंबईतील करोना मृत्यू १००० ने वाढण्याची शक्यता!
3 पत्रकारिततेला धडाडीचा आवाज शांत झाला! दिनू रणदिवे यांचं वृद्धापकाळाने निधन
Just Now!
X