26 February 2021

News Flash

“हा पोलिसांनी घेतलेला सूड”, विकास दुबे चकमकीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

संजय राऊत यांच्याकडून पोलिसांचं खच्चीकरण करणारी वक्तव्यं न करण्याचं आवाहन

संग्रहित फोटो (PTI)

उत्तर प्रदेश पोलिसांनी कुख्यात गुंड विकास दुबेला ठार करण्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतक्रिया दिली असून हा पोलिसांनी घेतलेला सूड असल्याचं सांगितलं आहे. संजय राऊत यांनी यावेळी चकमकीचं समर्थन केलं नाही तरी पोलिसांचं खच्चीकरण करणारी वक्तव्यं केली जाऊ नयेत असं आवाहन केलं आहे. मोठी नावं बाहेर येऊ नयेत यासाठी विकास दुबेला ठार केल्याच्या आरोपावर बोलताना संजय राऊत यांनी, मला असं वाटत नाही. आपल्या सहकाऱ्यांच्या मृत्यूचा पोलिसांनी घेतलेला हा सूड आहे असं म्हटलं. संजय राऊत यांनी सामना कार्यालयात प्रसारमाध्यामांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

“हा उत्तर प्रदेश किंवा योगींचा प्रश्न नाही. देशाच्या कोणत्याही राज्यात असं झालं तर पोलीस त्याला जिवंत सोडणार नाहीत. पोलीस आपल्या सहकाऱ्याच्या मृत्यूचा बदला नेहमी घेतं. जे झालंय त्याचं राजकारण होता कामा नये,” असं आवाहन यावेळी संजय राऊत यांनी केलं. “अशा घटना याआधीही देशात झाल्या आहेत. मुंबईत तर आपल्याकडे अनेक एन्काऊंटर स्पेशलिस्ट आहेत. त्यांच्यावर चित्रपटही आले आहेत. दिल्ली, हैदराबादमध्येही अशा चकमकी झाल्या आहेत. मी खोट्या चकमकीचं कधी समर्थन केलं नाही आणि करणारही नाही. पण जर पोलिसांची हत्या झाली असेल, पोलिसांची प्रतिष्ठा आणि भीती राहिली नसेल तर देशात कायदा-सुव्यवस्था राहणार नाही,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

“विकास दुबेसारखी जी लोकं निर्माण केली जातात ती अनेक राजकारण्यांची गरज असते. निवडणुका जिंकण्यासाठी, खंडणी गोळा करण्यासाठी, दहशत निर्माण करण्यासाठी असे लोक काही राज्यात पोलीस, राजकारणी तयार करतात. विकास दुबेही अनेक पक्षांशी संबंधित होता. याला राजकारण जबाबदार आहे. आधी राजकारणी गुन्हेगारांचा वापर करुन घेत होते. आता गुन्हेगार राजकारणात येत आहेत. गुन्हेगारीचं राजकारण होणं धोकादायक आहे,” असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

विकास दुबेला एक पक्ष विधानसभेचं तिकीट देणार होतं.. पण तो सरेंडर झाला नाही म्हणून मिळालं नाही असा गौप्यस्फोट यावेळी संजय राऊत यांनी केला. चकमकीवर बोलताना संजय राऊत यांनी, “त्या राज्याची प्रतिमा धुळीस मिळाल्यानंतर अशी कारवाई करण्याशिवाय पर्याय नाही. समर्थन केलं नाही तरी पोलिसांचं खच्चीकरण होईल अशी भूमिका राजकीय पक्षाने घेऊ नये. बिहार, उत्तर प्रदेशात तर सब हमाम मै नंगे अशी परिस्थिती आहे,” असं सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2020 12:27 pm

Web Title: shivsena sanjay raut on vikas dubey encounter by uttar pradesh police sgy 87
Next Stories
1 मुंबई होणार अधिक वेगवान; ‘या’संदर्भात झाले सामंजस्य करार
2 Coronavirus  : कांदिवली, बोरिवली, दहिसर नियंत्रणात
3 तीन महिन्यांत बेस्टला १५० कोटींचा तोटा
Just Now!
X