शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घेतलेल्या मुलाखतीची सध्या सर्वांनाच उत्सुकता आहे. संजय राऊत ट्विटरला मुलाखतीचे प्रोमो शेअर करत असून ही उत्सुकता वाढवत आहेत. या प्रोमोमध्ये मुलाखतीत नेमकं काय पहायला मिळणार आहे याची झलक दिसत आहे. दरम्यान संजय राऊत यांनी मुलाखतीचा दुसरा प्रोमो शेअर केला असून यामध्ये उद्धव ठाकरे गुंतवणूक, महाविकास आघाडी अशा मुद्द्यांवर बोलताना दिसत आहे.

मुलाखीच्या प्रोमोत दिसत असल्याप्रमाणे आपण अजिबात निराशावादी नसून कोणलाही होऊदेखील देणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. धोऱणाची अनिश्चितता असेल तर गुंतवणूक अजिबात येणार नाही. सोबतच संयम पाहिजे की यम हे तुम्ही ठरवा अशी अनेक विधानं उद्धव ठाकरे यांनी केली आहेत. याशिवाय राष्ट्रभक्ती ही संपूर्ण देशाची सारखी असली पाहिजे आणि माझी आहे असंही ते सांगताना दिसत आहेत.

याआधी संजय राऊत यांनी शेअर केलेल्या प्रोमोमध्ये उद्धव ठाकरे यांनी मी ट्रम्प नाही, डोळ्यांसमोर माझी माणसं तळमळताना पाहू शकत नाही अशा शब्दांत आपल्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. पहिल्या प्रोमोमध्ये संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना पहिल्या सहा महिन्यांचा कार्यकाळ, समोर उभी राहिलेली संकटं अशा अनेकांवर प्रश्न विचारलेली दिसत आहेत. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रात लष्कर बोलावण्याची वेळ आली होती का ? मुंबईच्या रस्त्यावर वडापाव कधी मिळणार ? तसंच मंत्रालयात कमी गेल्याचा होणार आरोप याबंधीही विचारलं आहे. ही मुलाखत २५ आणि २६ जुलै अशा दोन भागांमध्ये प्रसिद्ध होणार आहे.