23 January 2018

News Flash

अस्थिकलशाच्या दर्शनाने शिवसैनिक पुन्हा भावनावश

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अस्थिकलश ‘मातोश्री’ निवासस्थानावरून शिवसेनाभवनात आणण्यात आल्या, तेव्हा अनेक शिवसैनिकांना अश्रू आवरणे कठीण गेले. शिवसेनाप्रमुखांच्या आठवणींनी सर्वच जण भारावले.

विशेष प्रतिनिधी, मुंबई | Updated: November 21, 2012 6:04 AM

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अस्थिकलश ‘मातोश्री’ निवासस्थानावरून शिवसेनाभवनात आणण्यात आल्या, तेव्हा अनेक शिवसैनिकांना अश्रू आवरणे कठीण गेले. शिवसेनाप्रमुखांच्या आठवणींनी सर्वच जण भारावले. राज्यातील लाखो शिवसेना कार्यकर्ते आणि जनतेला अंत्यदर्शन घेता न आल्याने हे अस्थिकलश दर्शनासाठी दोन दिवस ठेवले जाणार असून २३ नोव्हेंबरला देशातील प्रमुख नद्यांमध्ये अस्थिविसर्जन केले जाणार आहे.
उध्दव ठाकरे यांनी अस्थिकलश मंगळवारी सकाळी शिवसेनाभवनमध्ये आणला, त्यावेळी शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. ज्येष्ठ नेते मनोहर जोशीं, संजय राऊत यांच्यासह शिवसेनेचे अनेक नेते यावेळी उपस्थित होते. शिवसेनेचे राज्य आणि जिल्हाप्रमुख अशा सुमारे १५० हून अधिक पदाधिकाऱ्यांना अस्थिकलश देण्यात आले. आणखी शेकडो अस्थिकलश तयार करण्यात आले असून ते देशभरात व राज्यात पाठविले जाणार आहेत. सर्वानी पुढील दोन दिवसांत दर्शन घेतल्यावर अस्थिविसर्जन होईल.    

First Published on November 21, 2012 6:04 am

Web Title: shivsena soldiers again cried after seeing bone pitcher
  1. No Comments.