शिवसेनेला उत्तर भारतीयांची मतंही हवी आहेत आणि हप्तेही हवे आहेत अशी टीका मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली. काही शिवसैनिकांनी उत्तर भारतीयांना जागेच्या वादावरून मारहाण केली त्याच प्रकरणात मनसेने ही टीका केली आहे. एकीकडे उत्तर भारतीय के सन्मान मे शिवसेना मैदानमे अशा घोषणा द्यायच्या आणि मग उत्तर भारतीयांना मारहाण करायची असं दुटप्पी धोरण सेनेकडून राबवलं जातं आहे असंही देशपांडे यांनी म्हटलं आहे. ओला-उबर कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार काहीच पावलं का उचलत नाही असाही प्रश्न देशपांडे यांनी विचारला आहे.

ओला आणि उबर यांच्या प्रमाणेच भविष्यात मनसेचे अॅप सुरु करण्याचा विचार आम्ही करतो आहोत अशीही माहिती संदीप देशपांडे यांनी दिली. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे चार दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर होते ते आजच मुंबईकडे रवाना झाले आहेत. राज ठाकरे यांनी आजच लोणार येथील सरोवरालाही भेट दिली.