शिवसेना पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. माजी महापौर आणि विभागप्रमुख दत्ता दळवींचा फोन टॅप केल्याप्रकरणी मुलुंडचे उपविभागप्रमुख जगदीश शेट्टी यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. जगदीश शेट्टी यांचे यांचे काँग्रेस आमदार नितेश राणेंशी चांगले संबंध असल्यामुळे त्यांची पक्षातूक हकालपट्टी केल्याचे शिवसेनेतून बोलले जात आहे.

ईशान्य मुंबईमध्ये दत्ता दळवी, दीपक सावंत आणि जगदीश शेट्टी यांचा सुरू असलेला अंतर्गत वाद समोर आला आहे. अंतर्गत वाद विकोपाला गेल्यानंतर माजी महापौर दत्ता दळवी यांनी ईशान्य मुंबईच्या विभाग कर्मांक सातचा राजीनामा दिला. तर पक्षविरोधी बैठका घेतल्यामुळे शाखाप्रमुख दीपक सांवत यांचीही पक्षातून हकालपट्टी केली आहे.

Raj thackeray, Mahayuti, MNS,
मनसेच्या पाठिंब्याने महायुतीचा फायदा किती ?
congress
सांगलीत मैत्रीपूर्ण लढत की माघार ? दिल्लीच्या निर्णयाची काँग्रेस नेत्यांना प्रतीक्षा
Gadchiroli, Congress
गडचिरोली : घटक पक्षातील नाराजी व जातीय समिकरणाचे काँग्रेसपुढे आव्हान !
Sharad Pawar on PM Narendra Modi
“सत्ता राखण्यात मोदीजी इतके तल्लीन झाले की, त्यांना…”; चीनच्या कुरापतीवरून शरद पवार गटाची पंतप्रधानांवर टीका