News Flash

धक्कादायक : पनवेलमधील क्वारंटाइन सेंटरमध्ये बलात्काराची घटना

बलात्काराचा गुन्हा दाखल; आरोपी आणि पीडिता दोघेही कोरोनाबाधित

प्रतिकात्मक छायाचित्र

पनवेलमधील इंडिया बुलच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये बलात्काराची घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आणि पीडिता दोघेही करोनाबाधित असून, त्यांना काही दिवसापूर्वी क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते.

बलात्काराची ही घटना गुरुवारी रात्री घडली. यातील आरोपी आणि पीडिता या दोघांनाही करोनाचा संसर्ग झाल्यानं उपचारासाठी पनवेल जवळ असलेल्या इंडिया बुलच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. दोघेही एकमेकांना ओळखत नाहीत, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

क्वारंटाइन सेंटरमध्येच हा प्रकार घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. या ठिकाणी पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील करोनाबाधित आणि करोना संशयितांना दाखल करण्यात येते . बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला असून, आरोपी युवक हा करोनाबाधित असल्याने त्यास अद्याप अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2020 3:43 pm

Web Title: shocking rape incident at the quarantine center in panvel msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 करोना योद्धे असलेल्या ६५० प्राध्यापक डॉक्टरांचा सेवेत कायम करण्यासाठी लढा!
2 जुळ्या बहिणींचे अनोखे जुळे यश…
3 १३० कोटींच्या तस्करीप्रकरणी फरार व्यापारी २३ वर्षांनी मुंबई पोलिसांच्या कचाट्यात
Just Now!
X