News Flash

मुंबईतील सभेत असदुद्दीन ओवेसी यांच्यावर फेकली चप्पल

चप्पल फेकणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्यात आली आहे.

Asaduddin Owaisi : मुस्लिमांसाठी शरिया सर्वोच्च आहे. तिहेरी तलाकच्या नावाखाली शरियामध्ये ढवळाढवळ केली जात असल्याचा आरोप ओवेसी यांनी केला.

एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना मंगळवारी मुंबईतील सभेदरम्यान एका व्यक्तीने चप्पल फेकून मारल्याचा प्रकार घडला. नागपाडा जंक्शन येथे एमआयएमकडून आयोजित जलशात ते बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात तिहेरी तलाक विधेयकाला विरोध केला. यावेळी एका व्यक्तीने त्यांच्या दिशेने चप्पल भिरकावली. या हल्ल्यात ओवेसी यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. असदुद्दीन ओवेसी यांच्यावर चप्पल फेकणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्यात आली आहे. मात्र, अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही.

लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकाला मंजूरी मिळाल्यानंतर असदुद्दीन ओवेसी सध्या देशभरात शरिया कायद्याचे संरक्षण व्हायला व्हावे, यासाठी प्रचार करत आहेत. मंगळवारी रात्री ९.४५ वाजण्याच्या सुमारास असदुद्दीन ओवैसी तिहेरी तलाक कायद्याबाबत बोलत असताना सभेमध्ये अचानक लोकांमधून ओवेसींच्या दिशेनं चप्पल भिरकावण्यात आली. या घटनेनंतर काही काळ गोंधळ झाल्याने ओवेसींनी काही क्षणांसाठी आपले भाषण थांबवले. यानंतर त्यांनी पुन्हा आपल्या भाषणाला सुरूवात केली. त्यांनी म्हटले की, हल्ला करणारे हे लोक महात्मा गांधी, गोविंद पानसरे आणि नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांच्या विचारधारेचे अनुकरण करणारे आहेत. तिहेरी तलाकचे विधेयक संसदेत रखडल्यामुळे निराश झालेल्या लोकांकडून हा हल्ला करण्यात आला. तलाकवर सरकारचा निर्णय जनतेने विशेषत: मुस्लिमांनी स्वीकारला नाही. पण मी लोकहितासाठी लढणारा नेता आहे. अशाप्रकारे द्वेष करणाऱ्या माणसांना घाबरत नाही. अशा हल्ल्यांनी आमचा आवाज दाबला जाऊ शकत नाही, असे त्यांनी म्हटले.

मुस्लिमांसाठी शरिया सर्वोच्च आहे. तिहेरी तलाकच्या नावाखाली शरियामध्ये ढवळाढवळ केली जात असल्याचा आरोप ओवेसी यांनी केला. मुस्लिमांचा कैवार घेणाऱ्या काँग्रेस, समाजवादी पार्टीसारख्या पक्षांनीही तिहेरी तलाकबाबत संसदेत भूमिका घेण्याचे टाळले. या पक्षातील नेते खासगीत मोदींना रोखण्याची भाषा करतात, प्रत्यक्षात तिहेरी तलाकसारख्या विषयांवर बोलायची वेळ येते तेव्हा मौन धारण करतात, असा आरोपही ओवेसी यांनी केला. मात्र, एमआयएम शरियामधील ही ढवळाढवळ सहन करणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2018 10:32 am

Web Title: shoe hurled at aimim chief asaduddin owaisi in mumbai rally
Next Stories
1 भाजपा ‘शत प्रतिशतचा’ नारा देऊ शकते, तर आम्ही स्वबळाची भाषा करण्यात काय गैर- उद्धव ठाकरे
2 राज्यभरात गारठा परतणार
3 महापौरांच्या वाहनाला अपघात
Just Now!
X