राज्यातील अनुदानित शाळांमधील शिक्षकांना अतिरिक्त ठरविणारा आदेश त्वरित मागे न घेतल्यास १ जुलैपासून राज्यातील शाळा बेमुदत बंद करण्याचा इशारा ‘महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदे’ने दिला आहे. संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या कल्याण येथे झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आंदोलनाचा भाग म्हणून शिक्षक परिषदेतर्फे २५ जूनला राज्यातील सर्व जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढतील. २७ जूनला मुंबईच्या आझाद मैदानात राज्यातील हजारो शिक्षण एकत्र येऊन आंदोलन करणार आहेत.

विनयभंग करणारा कुरीयर बॉय अटकेत
मुंबई : कुरियर देण्याच्या निमित्ताने आलेल्या कर्मचाऱ्याने घरातील मोलकरणीचा विनयभंग केल्याची घटना शिवडी येथे सोमवारी घडली. पीडित महिलेने आरडाओरड केल्यानंतर संशयित आरोपीस रहिवाशांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.  अर्शद अन्वर शेख (२२) असे असे आरोपीचे नाव असून तो अंधेरी येथे राहतो. शिवडीतील झकेरिया मार्गावरील एका इमारतीत चुकीच्या पत्त्यावर दिलेले दुपारी परत आणण्यासाठी अर्शद घरात आला होता.

जादूटोण्याच्या संशयावरून  कुरारमध्ये महिलेची हत्या
मुंबई : जादुटोण्याच्या संशयावरून एका महिलेची हत्या केल्याची खळबळजनक घटना मालाडमध्ये उघडकीस आली आहे. कुरार पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली आहे.
सुकरी झोप (५८) असे मृत महिलेचे नाव आहे. ती मालाडच्या कुरार गावातील बारीक पायली बाटुकली पाडय़ात राहत होती.

विनयभंगप्रकरणी दिग्दर्शकाला अटक
मुंबई : अभिनेत्रीचा विनयभंग केल्याप्रकरणी दिग्दर्शक सुभाष कपूरला सोमवारी वर्सोवा पोलिसांनी अटक केली. नंतर त्याची जामिनावर सुटका झाली. या प्रकरणातील कपूरचा साथीदार दानिश रजा फरार आहे.