गुगलचे पहिले सोशल नेटवर्किंगचे संकेतस्थळ ऑर्कुट मंगळवारी अधिकृतपणे बंद करण्यात आले. फेसबुकच्या प्रभावापुढे हतबल झालेले हे संकेस्थळ वापरकर्त्यांच्या दृष्टीने कधीच इतिहासजमा झाले होते.   ऑर्कुट बायकोक्टेन या तुर्कीश तरुणाने तयार केलेले हे संकेतस्थळ २००४मध्ये वापरकर्त्यांसाठी खुले करण्यात आले. यामुळे मैत्रीचे नवे जाळे तयार झाले होते. इतकेच नव्हे तर जगभरातील समविचारी माणसांनी एकत्रित येऊन या संकेतस्थळावर विविध चळवळीही सुरू केल्या. पण कालांतराने फेसबुकचा प्रभाव खूप वाढला आणि ऑर्कुटचा वापर कमी होऊ लागला. यामुळे हे संकेतस्थळ बंद करण्याचा निर्णय गुगलने घेतला. ऑर्कुटवरील सर्व अकाऊंट्सवरील माहिती गुगलने साठवून ठेवली असून ती माहिती डिलिट करण्याचा किंवा तुम्हाला मिळवण्याचा पर्याय ऑर्कुटने खुला ठेवला आहे.

वांद्रे ते मालाडपर्यंतचा वीजपुरवठा खंडित
मुंबई : टाटा पॉवर कंपनीच्या तीन पारेषण वाहिन्यांत तांत्रिक बिघाड झाल्याने मंगळवारी सायंकाळी वांद्रे ते मालाडपर्यंत वीजपुरवठा २०-२५ मिनिटे खंडित झाला होता.
मुंबईत सायंकाळी पावसाचे वातावरण असताना साडेसहाच्या सुमारास ‘टाटा पॉवर’च्या ११० आणि २२० केव्ही पारेषण वाहिन्यांत बिघाड झाला. परिणामी वांद्रे ते मालाडपर्यंतचा वीजपुरवठा खंडित झाला. ६. ५२ च्या सुमारास दोन वाहिन्या पूर्ववत होऊन वीजपुरवठा सुरळीत झाला. तिसऱ्या वाहिनीच्या दुरुस्तीचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पावसाळी हवेमुळे हा बिघाड झाल्याचे ‘टाटा पॉवर’ने म्हटले आहे.

अंजली दमानिया, प्रीती शर्मा यांचा ‘आप’ पदांचा राजीनामा
मुंबई : आम आदमी पक्षाच्या राज्य समन्वयक अंजली दमानिया आणि राज्य सचिव प्रीती शर्मा-मेनन यांनी कौटुंबिक कारणावरून त्यांच्या पदाचे राजीनामे दिले आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून कौटुंबिक जीवन, करिअर आणि पक्षकार्य यात आमची ओढाताण होत होती. आता पृथ्वी रेड्डी आणि अतिषी यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे आम्ही राजीनामा दिला, असे या दोघींनी नमूद केले आहे.

‘दादर-सावंतवाडी राज्यराणी एक्स्प्रेस’च्या वेळापत्रकात बदल
मुंबई : दादर- सावंतवाडी ‘राज्यराणी एक्स्प्रेस’ची वेळ १ ऑक्टोबरपासून बदलण्यात आली आहे. ही गाडी दादरहून रात्री ११.५५ वाजता सुटत होती. आता ती १ ऑक्टोबरपासून रात्री ००.०५ वाजता सुटणार आहे. म्हणजेच आता १ ऑक्टोबरचे आरक्षण असलेल्या प्रवाशांना ३० सप्टेंबरला रात्री १२ वाजल्यानंतर पकडावी लागणार आहे.

short news from mumbai
mumbai news
संक्षिप्त : ऑर्कुट इतिहासजमा
खास प्रतिनिधी, मुंबई<br />गुगलचे पहिले सोशल नेटवर्किंगचे संकेतस्थळ ऑर्कुट मंगळवारी अधिकृतपणे बंद करण्यात आले. फेसबुकच्या प्रभावापुढे हतबल झालेले हे संकेस्थळ वापरकर्त्यांच्या दृष्टीने कधीच इतिहासजमा झाले होते.   ऑर्कुट बायकोक्टेन या तुर्कीश तरुणाने तयार केलेले हे संकेतस्थळ २००४मध्ये वापरकर्त्यांसाठी खुले करण्यात आले. यामुळे मैत्रीचे नवे जाळे तयार झाले होते. इतकेच नव्हे तर जगभरातील समविचारी माणसांनी एकत्रित येऊन या संकेतस्थळावर विविध चळवळीही सुरू केल्या. पण कालांतराने फेसबुकचा प्रभाव खूप वाढला आणि ऑर्कुटचा वापर कमी होऊ लागला. यामुळे हे संकेतस्थळ बंद करण्याचा निर्णय गुगलने घेतला. ऑर्कुटवरील सर्व अकाऊंट्सवरील माहिती गुगलने साठवून ठेवली असून ती माहिती डिलिट करण्याचा किंवा तुम्हाला मिळवण्याचा पर्याय ऑर्कुटने खुला ठेवला आहे.