News Flash

माथेरान मिनी ट्रेनला पर्यटकांचा अल्प प्रतिसाद

जानेवारीमध्ये ३३ हजार प्रवाशांनी प्रवास केला होता

(संग्रहित छायाचित्र)

पर्यटक व स्थानिकांसाठी नोव्हेंबर २०२० पासून सुरू झालेल्या अमन लॉज ते माथेरान दरम्यान धावणाऱ्या मिनी ट्रेनला मिळणारा पर्यटकांचा प्रतिसाद ओसरला आहे. जानेवारीमध्ये ३३ हजार प्रवाशांनी प्रवास केला होता. आता मार्च महिन्यात हीच संख्या साडे अकरा हजारापर्यंत आली आहे.

टाळेबंदीच्या काळात माथेरान मिनी ट्रेनची सेवा बंदच होती. टाळेबंदी शिथिल होताच शहरानजीकच्या पर्यटन स्थळांकडे पर्यटकांची पावले वळू लागली. माथेरानलाही पर्यटकांचा प्रतिसाद वाढू लागला. परंतु बंद असलेल्या मिनी ट्रेनमुळे पर्यंटकांचा हिरमोड होत होता. तर स्थानिकांनाही नेरळ ते माथेरान जाण्यासाठी अमन लॉजपर्यंत टॅक्सी आणि नंतर पायपीट करावी लागत होती. अखेर नोव्हेंबर २०२० पासून माथेरान ते अमन लॉज शटल सेवा सुरू झाली.

या गाडीच्या दररोज १२ फेऱ्या होतात. ही सेवा सुरू होताच त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला. परंतु करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांचा प्रतिसाद ओसरू लागल्याचे दिसत आहे.

करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने आणि काहीसा उकाडाही वाढल्याने प्रवाशांचा प्रतिसाद कमी होत असल्याचे दिसत आहे. एप्रिल, मे महिन्यात सुट्ट्या सुरू झाल्यावर प्रतिसाद  काहिसा वाढू शकेल अशी आशा आहे, असे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

* नेरळ ते माथेरान मिनी टेनमधून नोव्हेंबर २०२० ते १५ मार्च २०२१ पर्यंत एकूण १ लाख १० हजार ७०२ प्रवाशांनी प्रवास के ला. यातून ६७ लाख रुपये महसूल रेल्वेला मिळाला.

* गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये १६ हजार ९४६ जणांनी प्रवास केला होता.

* जानेवारी २०२१ मध्ये हीच संख्या ३३ हजार ५१५ पर्यंत पोहोचली.

* फेब्रुवारी २० हजार ५४८ आणि आता मार्चमध्ये ११ हजार ५०७ प्रवाशांची संख्या कमी झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2021 12:18 am

Web Title: short response of tourists to matheran mini train abn 97
Next Stories
1 शासकीय वसतिगृहांचे ‘मातोश्री’ नामकरण
2 रुग्णालयांच्या मुजोरीला चाप
3 कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पाला गती
Just Now!
X