महागडय़ा औषधांचा भार रुग्णांवर

मुंबईतील मध्यवर्ती असलेल्या लोकमान्य टिळक पालिका रुग्णालयात (शीव) गेल्या महिनाभरापासून जीवरक्षक औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. अतिदक्षता, अपघात विभागात महत्त्वाची औषधेही उपलब्ध नसल्याने शीव रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल झालेल्या रुग्णांना बाहेरील औषध दुकानांतून चढय़ा दराने औषधे खरेदी करावी लागत आहेत. या रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांत गरीब रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा त्यांच्यासाठी जीवनमरणाचा प्रश्न बनला आहे.

Rats in operating theaters of V N Desai Hospital
व्ही. एन. देसाई रुग्णालयातील शस्त्रक्रियागृहांमध्ये उंदरांचा सुळसुळाट
High Blood Pressure Cases, High Blood Pressure Rising in india, 4 out of 10 Patients Not Checking, Patients Not Checking Regularly, high blood pressure unhealthy lifestyle, smoking,
१० पैकी ४ रूग्णांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यास टाळाटाळ! अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार व स्ट्रोकचा धोका…
chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?
Electrolyte-rich drinks in summer is good for health
उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये फायदेशीर; डिहायड्रेशन दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या खास टिप्स

शीव रुग्णालयाच्या अतिदक्षता, हृदयविकार, अपघात विभाग येथे जीव वाचविणारी महत्त्वाची औषधे कायम उपलब्ध असणे गरजेचे आहे. मात्र गेल्या महिनाभरापासून रुग्णांना ही औषधे रुग्णालयातून उपलब्ध होत नाहीत. त्यांना ही औषधे बाहेरील औषधांच्या दुकानातून आणावी लागत आहेत, अशी तक्रार रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनीच केली आहे. रुग्णालय व्यवस्थापनाकडे औषधांची विचारणा केल्यानंतरही कारणे सांगून टाळाटाळ केली जात असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

अपघात विभागात येणाऱ्या रुग्णांची परिस्थिती अतिशय गंभीर असते. अनेकदा यांचा रक्तदाब ४० ‘एमएमएचजी’पर्यंत खाली येतो. अशा वेळी त्यांना तातडीने ग्लुकोज लावून रक्तदाब सुस्थितीत करण्यासाठी नॉरअ‍ॅड्रीनालीन, अ‍ॅड्रीनालीन, डोपामीन, डोबीटामीन यापैकी एक औषध इंजेक्शनद्वारे दिले जाते. मात्र गेले महिनाभरापासून अपघात व अतिदक्षता विभागात ही औषधे उपलब्ध नाहीत. या औषधांची आवश्यकता असल्यास रुग्णाच्या नातेवाईकांना बाहेरून आणावी लागतात, तर हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना ‘अ‍ॅट्रोपीन’ हे औषध दिले जाते. शिवाय हृदयावर दाब देऊन ठोके वाढविण्यापूर्वी हे औषध इंजेक्शनच्या साहाय्याने दिले जाते. मात्र रुग्णालयाच्या औषध विभागाकडून या औषधांची विचारणा केली असता उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते, असे या रुग्णालयातील एका निवासी डॉक्टराने सांगितले, तर रुग्णालयाच्या सामाजिक सेवा विभागातही औषधांची मागणी करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून अगदी साध्या औषधांसाठीही रुग्णांना देणगीची वाट पाहावी लागत आहे.

निविदा प्रक्रियेच्या गोंधळामुळे रुग्णालयात काही प्रमाणात औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र ही परिस्थिती सर्वच पालिका रुग्णालयांची आहे, असे शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुलेमान र्मचट यांनी सांगितले.

याबाबत पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्याचे उपआयुक्त रामभाऊ भाऊसाहेब धस यांनी सांगितल्याप्रमाणे रुग्णालयांपर्यंत औषधे पुरविण्यासाठी कुठलीही अडचण नसून औषधांच्या तुटवडय़ासाठी रुग्णालय व्यवस्थापनाकडून उशीर झाला असण्याची शक्यता आहे.

रुग्णांच्या जिवाशी खेळ

* २०० ‘एमएमएचजी’पर्यंत रक्तदाब पोहोचलेल्या रुग्णांच्या हृदयावर ताण येतो व रक्त मूत्रपिंडात प्रवेश करते. अशा वेळी इन्टीजी नावाचे औषध सुरू केल्यानंतर रुग्णाचा रक्तदाब सुरळीत होतो. हे औषध देण्यास उशीर झाल्यास रुग्ण दगावू शकतो, ही महत्त्वाची औषधेही या विभागात उपलब्ध नाहीत.

* या रुग्णालयाच्या डायलेसिस केंद्रात आलेल्या रुग्णांना डायलेजरदेखील ७०० रुपये खर्च करून बाहेरून घ्यावा लागतो. ही सेवा रुग्णांना कायम मोफत दिली जात होती. मात्र महिनाभरापासून रुग्णांनाच हा बोजा उचलावा लागत आहे.

* पावसाळ्यात साथीच्या आजारांत गंभीर तापाच्या रुग्णांसाठी आवश्यक असलेली मॅरोपेनम, कोलिस्टीन, पिप्टा ही (अँटिबायोटिक) औषधेही रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये उपलब्ध नाहीत.

सध्या सर्वच पालिका रुग्णालयांत कमी-अधिक प्रमाणात औषधांचा तुटवडा जाणवत आहे. औषधांवरील वस्तू व सेवा कर लागू झाल्यामुळे औषधे खरेदीसाठी वेळ लागत आहे. मात्र काही दिवसात ही परिस्थिती सुरळीत होईल व पालिका रुग्णालयांतील प्रत्येक रुग्णाला औषधे उपलब्ध होतील.

– डॉ.रमेश भारमल, नायर रुग्णालय अधिष्ठाता

‘औषधांवर १५ हजारांचा खर्च’

भावेश गुप्ता हा १२ वर्षीय रुग्ण गेले महिनाभरापासून शीव रुग्णालयात दाखल आहे. अपघातादरम्यान त्याच्या डोक्याला मार लागल्याने त्यांच्यावर रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक २४ मध्ये उपचार सुरू आहे. उपचारादरम्यान सर्वच औषधे बाहेरील औषधांच्या दुकानातून आणल्याचे भावेशची आई संगीता गुप्ता यांनी सांगितले. आतापर्यंत औषधांसाठी १० ते १५ हजार रुपये खर्च झाल्याचे संगीताने सांगितले.