15 July 2020

News Flash

नामांकित चार रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस

खाटा उपलब्ध न करणे, उपचार दर जाहीर न केल्याने कारवाई

संग्रहित छायाचित्र

खासगी रुग्णालयाच्या ८० टक्के खाटा ताब्यात घेऊनही रुग्णांना दाखल करून न घेणे, उपलब्ध खाटांचा तपशील, उपचाराचे दर जाहीर न करणे, धर्मादाय रुग्णालयातील राखीव खाटापैकी ९० टक्के खाटा रिक्त असणे या कारणास्तव बॉम्बे, पी.डी.हिंदुजा, जसलोक आणि लीलावती या नामांकित रुग्णालयांना महात्मा फुले जनआरोग्य सोसायटीने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

करोनाच्या पाश्र्वभूमीवर खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा राज्य शासनाने ताब्यात घेतल्या आहेत. मात्र अद्यापही काही ठिकाणी रुग्णांना खाटा उपलब्ध नाही असे सांगत रुग्णालयांकडून अपेक्षित मिळत नसल्याच्या तक्रारी येत असल्याने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  मुंबईतील बॉम्बे, पी.डी. हिंदुजा, जसलोक आणि लीलावती या खासगी रुग्णालयांना अचानक भेटी दिल्या.

या रुग्णालयातील क्षमतेपैकी ५० टक्के खाटाही कार्यरत नसणे. रुग्णालयातील उपलब्ध खाटांची माहिती, दर निदर्शनास येतील असे जाहीरपणे न लावणे. करोनाचे रुग्ण सेवेसाठी ताटकळत असूनही ८० टक्के राखीव खाटांपैकी अधिकाधिक खाटा या रुग्णांसाठी उपलब्ध न करणे. राज्य सरकारच्या सूचनानुसार रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांचे समुपदेशन न करणे. धर्मादाय रुग्णालयातील राखीव असलेल्या खाटांपैकी ९० टक्के खाटा रिक्त असल्याचे या पाहणीत आढळले. रात्री दहाच्या सुमारास सुरू झालेली ही मोहीम पहाटे दोन पर्यंत सुरू होती. रुग्णांना खाटा नाकारू नका. त्यांना वेळेवर उपचार द्या. शासनाला सहकार्य करा, अशा सूचना टोपे यांनी रुग्णालय प्रशासनाला यावेळी दिल्या.

राज्य सरकारच्या सूचनांचे पालन न केल्याने कारवाई का करू नये अशी नोटीस या रुग्णालयांना महात्मा फुले जन आरोग्य सोसायटीने या पाहणीनंतर पाठविली असून ४ जूनपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. आदेशाचे पालन न करणाऱ्या रुग्णालयांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही या नोटीसमध्ये दिला आहे.

‘नोटिशीला लवकरच उत्तर’

राज्य सरकारच्या सूचनांचे पालन केले जात असून लवकरच सरकारच्या नोटीसला उत्तर दिले जाईल. राज्य सरकारला सहकार्य करत असून करोनाबाधित रुग्णांना सेवा देण्यासाठी अनेक पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे पी.डी.हिंदुजा रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2020 12:10 am

Web Title: show cause notice to four nominated hospitals abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 झोपु प्राधिकरणात समितीपाठोपाठ आता सचिवपदासाठी मोर्चेबांधणी
2 ‘करून दाखवले’ला प्रताप चव्हाट्यावर येताच तो झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न : राम कदम
3 Cyclone Nisarga: मुंबईमधील विधानभवन परिसरात झाडे पडली; रस्त्यांवर फांद्या, लाकडांचा खच
Just Now!
X