अनधिकृत होर्डिंग्ज प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे, पक्षाचे नेते बाळा नांदगावकर आणि भाजपचे आमदार आशिष शेलार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. न्यायालयाचा अवमान केल्याचा खटला का चालविण्यात येऊ नये, याचा खुलासा करावा, असाही आदेश न्यायालयाने दिला आहे.
उच्च न्यायालयात यापूर्वी झालेल्या सुनावणीवेळी अनधिकृत होर्डिंग लावली जाणार नाहीत, असे प्रतिज्ञापत्र याच्याकडून न्यायालयात देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही मुंबईमध्ये अनधिकृत होर्डिंग लावल्यामुळे याचिकाकर्त्यांनी पुन्हा न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. त्यावरील सुनावणीवेळी न्यायालयाने राज ठाकरे, बाळा नांदगावकर आणि आशिष शेलार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.