News Flash

श्रुती कुलकर्णी आणि अक्षय चव्हाण ब्लॉग बेंचर्सचे विजेते

अग्रलेखावर मत मांडणाऱ्या श्रुती आणि अक्षय यांनी दर्जेदार लेखन करत ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत बाजी मारली.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

श्रुती कुलकर्णी आणि अक्षय चव्हाण ब्लॉग बेंचर्सचे विजेते

आतापर्यंत केंद्र सरकारने जमा केलेल्या महसुलातील राज्यांचा वाटा संबंधित राज्यांना दर महिन्याच्या पहिल्या तारखेस देण्याची प्रथा होती. ती आता बदलली जाणार आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन, कर्जावरील व्याज आदींसाठी राज्यांना महसूल वाटा पहिल्या तारखेस मिळणे गरजेचे असते. परंतु केंद्राच्या नव्या बदलाप्रमाणे महिन्याच्या १५ तारखेला त्यांच्या करातील वाटा देण्यात येईल. यावर पश्चिम बंगाल आणि तेलंगण सरकारने केंद्र सरकारला लिहिलेल्या पत्रात संभाव्य संघर्षांची बीजे दडलेली आहेत. या विषयावर सांगोपांग विवेचन ‘आधी की नंतर’ या अग्रलेखात करण्यात आले आहे. या अग्रलेखावर आपली भूमिका मांडत रत्नागिरी येथील श्रीराम भागोजी शेठ कीर विधि महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्रुती कुलकर्णी ‘ब्लॉग बेंचर्स’च्या पहिल्या पारितोषिकाचा मानकरी ठरली आहे. या स्पर्धेत पुण्यातील फग्र्युसन महाविद्यालयाचा विद्यार्थी अक्षय चव्हाण याने दुसरे पारितोषिक पटकावले.

अग्रलेखावर मत मांडणाऱ्या श्रुती आणि अक्षय यांनी दर्जेदार लेखन करत ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत बाजी मारली. श्रुतीला सात हजार आणि प्रमाणपत्र तर अक्षयला पाच हजार  रुपये आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात येईल. या अग्रलेखावर व्यक्त होताना राज्यभरातील अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांना चालना देत उत्तम लेखन केले. महाविद्यालयीन युवा शक्तीच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या स्पर्धेला विद्यार्थी भरभरून प्रतिसाद देत आहेत. यात प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यांना पुढील आठवडय़ाच्या गुरुवारपर्यंतची मुदत दिली जाते. लेखांचे परीक्षण तज्ज्ञ परीक्षकांकडून केले जाते. त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाची बक्षिसे काढली जातात.

विद्यार्थ्यांचा स्पर्धेला भरभरून प्रतिसाद

पहिल्याच लेखापासून या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. विजेत्या विद्यार्थ्यांचे लेख ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केले जातात. ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील वाचकांना या निमित्ताने तरुणाईचे अंतरंग समजून घेण्याची संधी मिळते. सहभागी होऊ  इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना www.loksatta.com/Blogbenchers या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2017 3:13 am

Web Title: shruti kulkarni and akshay chavan loksatta blog bencher winner
Next Stories
1 पाच हजार डॉक्टर पदव्युत्तर परीक्षेला मुकणार!
2 फेरीवाल्यांबाबत स्थगिती आदेशास न्यायालयाचा नकार
3 पश्चिम, मध्य रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक
Just Now!
X