21 September 2020

News Flash

अमिताभ, सॅम पित्रोदा, सुषमा स्वराज यांना ‘एसआयइएस’चे ‘राष्ट्रीय प्रतिष्ठा पुरस्कार’

‘एसआयईएस’ या संस्थेतर्फे देण्यात येणारे ‘श्रीचंद्रशेखरेंद्र सरस्वती राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर झाले असून यंदा ते अमिताभ बच्चन, तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ सॅम पित्रोदा, लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या सुषमा

| December 19, 2012 07:01 am

‘एसआयईएस’ या संस्थेतर्फे देण्यात येणारे ‘श्रीचंद्रशेखरेंद्र सरस्वती राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर झाले असून यंदा ते अमिताभ बच्चन, तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ सॅम पित्रोदा, लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज आणि चिन्मय मिशनचे स्वामी तेजोमयानंद यांना घोषित झाले आहेत. कांची महास्वामी महोत्सवाच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून देण्यात येणारे हे पुरस्कार २५ डिसेंबर रोजी प्रदान करण्यात येतील. हा कार्यक्रम षण्मुखानंद सभागृहात होणार आहे.
‘साउथ इंडियन एज्युकेशन सोसायटी’तर्फे हा राष्ट्रीय प्रतिष्ठा पुरस्कार १९९८ पासून प्रदान करण्यात येतो. हा पुरस्कार कांची पीठाचे शंकराचार्य चंद्रशेखरेंद्र सरस्वती यांच्या स्मरणार्थ दिला जातो. चंद्रशेखरेंद्र सरस्वती यांच्या निधनानंतर एसआयईएसचे अध्यक्ष व्ही. शंकर यांनी या पुरस्कारांची सुरुवात केली. हा पुरस्कार सामाजिक नेतृत्त्व, विज्ञान व तंत्रज्ञान, सामाजिक विचारवंत आदी क्षेत्रांतील महनीय व्यक्तींना प्रदान करण्यात येतो. गेल्या वर्षी हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार, डॉ. जयंत नारळीकर यांना प्रदान करण्यात आला होता. प्रत्येकी अडीच लाख रुपये, मानपत्र, दीप असे या पुरस्काराचे स्वरूप असते.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2012 7:01 am

Web Title: sies national status award to amitabh sam pitroda sushma swaraj
टॅग Award,Sushma Swaraj
Next Stories
1 आमिर खान ‘एक्सप्रेस अड्डा’चा पाहुणा
2 कळवा-ठाणे दरम्यान उद्या रात्री विशेष ब्लॉक
3 सिंचन क्षेत्राची चौकशी होणार की ‘जलसंपदा’तील गैरव्यवहारांची?
Just Now!
X