कल्याण आणि ठाकुर्ली या दोन रेल्वेस्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक २० ते २५ मिनिटे उशिराने सुरू आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. कल्याण आणि ठाकुर्ली या दोन स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. धीम्या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत. लोकल एकामागोमाग एक थांबल्या आहेत असे काही प्रवासी फेसबुक आणि सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. ज्यामुळे लोक ट्रेनमध्येच अडकून पडले आहेत.

गेल्या आठवड्यात झालेल्या पावसानेही मध्य रेल्वेची दाणादाण उडवली होती. सुमारे पाच दिवस मध्य रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक उशिराने होत होती. आता आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. डाऊन मार्गावरच्या सिग्नलवर बिघाड झाल्याने मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. यामुळे धीम्या मार्गावरची वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली आहे. तसेच सिग्नलच्या दुरूस्तीचे कामही सुरू करण्यात आले आहे. डोंबिवली या स्थानकातून विशेष लोकल सोडण्यात येत आहेत. मध्य रेल्वेची सेवा लवकरच सुरळीत होईल असेही त्यांनी म्हटले आहे.