05 March 2021

News Flash

सणासुदीला पामतेल गायब होण्याची चिन्हे

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीचा फटका पामतेल आयातीला बसत असून दसरा-दिवाळीला शिधावाटप दुकानांमधून पामतेल गायब होण्याची चिन्हे आहेत.

| September 11, 2013 01:33 am

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीचा फटका पामतेल आयातीला बसत असून दसरा-दिवाळीला शिधावाटप दुकानांमधून पामतेल गायब होण्याची चिन्हे आहेत. राज्य सरकारवरील आर्थिक भारही दुपटीहून अधिक वाढणार आहे.
राज्यात सध्या दारिद्रय़ रेषेखालील शिधापत्रिकाधारकांना दरमहा एक लिटर पामतेल दिले जाते. पामतेल वाटप योजनेची मुदत सप्टेंबपर्यंत असून पुढील काळासाठी अजून कोणताही निर्णय झालेला नाही. हे पामतेल आयात केले जाते. या योजनेसाठी केंद्र शासन प्रतिलिटर १५ रुपये अनुदान देते व उर्वरित आर्थिक भार राज्य शासन उचलते. गेल्या सहा महिन्यांसाठी सुमारे ७५ कोटी रुपयांची तरतूद पामतेल आयातीसाठी सरकारने केली होती. पण गेल्या दोन महिन्यांमध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण झाल्याचा फटका या आयातीलाही बसणार आहे.
केंद्र शासनाने अजून पामतेलाबाबत काहीही निर्णय घेतलेला नसल्याने राज्य सरकार वाट पहात आहे. पण लवकरच त्याबाबत निर्णय घ्यावा लागेल, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. रुपयाच्या विनिमयाचा दर, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील पामतेलाचा दर व केंद्र सरकार किती वाटा उचलणार, यावर राज्य सरकारचा भार किती वाढेल, हे अवलंबून राहणार आहे. पण १५० ते २०० कोटी रुपयांवर हा खर्च जाण्याची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पामतेल आयातीसाठी मंत्रिमंडळाची मान्यता, निविदा, आयात आणि वाटप यासाठी किमान ४५-५० दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे लवकरात लवकर निर्णय न झाल्यास दसरा-दिवाळीला शिधावाटप दुकानांमधून पामतेलाचा खडखडाट होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2013 1:33 am

Web Title: signs of missing palm oil during ganesh festival
Next Stories
1 विसर्जनाच्या वेळी ५४ जणांना माशांचा चावा
2 वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्टॉलबद्दल गणेशोत्सवानंतर निर्णय -मुख्यमंत्री
3 जिया खानचा वेशभूषाकार अनिल चेरियनचा गूढ मृत्यू
Just Now!
X