10 July 2020

News Flash

शीव उड्डाणपूल आजही बंद

६ एप्रिल पर्यंत प्रत्येक आठवडय़ात चार दिवस पुलावरील वाहतूक दुरूस्तीच्या काळात बंद राहणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

दुरुस्तीच्या कारणास्तव बंद असलेला शीव उड्डाणपूल सोमवारीदेखील बंद असणार आहे. उड्डाणपुलाचे बेअरिंग बदलण्याचे काम १४ फेब्रुवारीपासून सुरू आहे. निर्धारित  वेळापत्रकानुसार १७ फेब्रुवारी (सोमवारी) सकाळी ६ वाजता उड्डाणपुलावरील वाहतूक सुरू होणार होती. मात्र, तांत्रिक कारणास्तव सोमवारी उड्डाणपूल वाहतुकीला खुला केला जाणार नाही असे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता शशिकांत सोनटक्के यांनी सांगितले. मंगळवारी सकाळी पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल. ६ एप्रिल पर्यंत प्रत्येक आठवडय़ात चार दिवस पुलावरील वाहतूक दुरूस्तीच्या काळात बंद राहणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2020 12:58 am

Web Title: sion flyover closed today abn 97
Next Stories
1 करोनामुळे सागरी किनारा मार्गाचे काम रखडण्याची शक्यता
2 राणीच्या बागेत बाराशिंगाच्या मादीचा मृत्यू
3 सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे लघू चित्रपटगृह उपक्रम -अमित देशमुख
Just Now!
X