24 March 2019

News Flash

सायन- पनवेल महामार्गावर सानपाड्याजवळ टँकरमधून गॅसगळती

सायन - पनवेल महामार्गावर शनिवारी सकाळी एका टँकरला चार चाकी वाहनाने मागून धडक दिली. अपघातात कोणीही जखमी झालेले नाही.

संग्रहित छायाचित्र

सायन – पनवेल महामार्गावर सानपाड्याजवळ टँकरमधून गॅसगळती झाली असून सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. यामुळे सायन – पनवेल महामार्गावर शनिवारी सकाळपासून वाहतूक कोंडी झाली आहे.

सायन – पनवेल महामार्गावर शनिवारी सकाळी एका टँकरला चार चाकी वाहनाने मागून धडक दिली. अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. मात्र, धडकेमुळे टँकरमधून गॅसगळती सुरु झाली. पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून टँकरमधील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये भरण्याचे काम सुरु असल्याचे समजते. लवकरच या मार्गावरील वाहतूक पूर्ववत होईल, असे पोलिसांनी सांगितले.

First Published on August 11, 2018 7:33 am

Web Title: sion panvel highway gas leak from tanker causes traffic jam