21 September 2020

News Flash

दहिसरमध्ये वहिनीच्या प्रियकराची हत्या

दहिसरमध्ये दोन भावांनी आपल्या विधवा वहिनीच्या प्रियकराची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. महेश शुक्ला (४०) असे या मयत प्रियकराचे नाव आहे. सोमवारी त्याचे अपहरण

| December 19, 2012 06:35 am

दहिसरमध्ये दोन भावांनी आपल्या विधवा वहिनीच्या प्रियकराची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. महेश शुक्ला (४०) असे या मयत प्रियकराचे नाव आहे. सोमवारी त्याचे अपहरण करण्यात आले होते. मंगळवारी दुपारी त्याचा मृतदेह विरार महामार्गाजवळील टोल नाक्याजवळ आढळून आला होता.
 याबाबत माहिती देतांना दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अन्सार पिरजादे यांनी सांगितले की, आंबेवाडी येथे राहणाऱ्या एका महिलेच्या पतीचे निधन झाले होते. तिचे त्याच भागात राहणाऱ्या महेश धर्मदत्त शुक्ला (४०) याच्याशी प्रेमसंबध जुळले होते. महेश याच्याही पत्नीचे निधन झाले होते. या महिलेच्या दिरांना या प्रेमसंबंधाची कुणकुण लागली होती. त्यामुळे त्यांनी या दोघांना दूर राहण्यास सांगितले होते. सोमवारी दोन्ही दिर अजय सिंग आणि जयेश सिंग यांनी आपल्या वहिनीला प्रियकरासोबत घरात एकत्र पाहिले होते. त्यांनी आपले दोन मित्र राजकुमार आणि विशाल यांच्यासह महेश शुक्ला याचे अपहरण केले. सोमवारी दहिसर पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. मंगळवारी महेश याचा मृतदेह विरारजवळील राष्ट्रीय महामार्ग ८ येथील टोल नाक्याजवळ सापडला. रात्री उशीरा अजय सिंग आणि विशाल या दोघांना ताब्यात घेण्यात आले होते. मयत याच्या गळ्यावर वार होते, तसेच डोक्यात मारहाणीच्या जखमा होत्या. आम्ही मृतदेहाची ओळख पटली असून या प्रकरणाचा अधिक तपास करीत असल्याचे पिरजादे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2012 6:35 am

Web Title: sister in law lover murdered in dahisar
Next Stories
1 अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
2 ‘२१ डिसेंबरला जगबुडी ही अफवा’
3 रिकॅलिब्रेट न झालेल्या वाहनांना आता प्रीपेड व्यवसाय बंदी
Just Now!
X