मनुकु मार श्रीवास्तव गृह सचिवपदी
मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी सीताराम कुंटे यांची महाविकास आघाडी सरकारने शनिवारी नियुक्ती के ली. मुख्य सचिव संजय कु मार हे रविवारी निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी १९८५च्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी सीताराम कुंटे यांची नियुक्ती करण्यात आली.
तसेच १९८६च्या तुकडीतील अधिकारी मनुकु मार श्रीवास्तव यांची अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) या प्रशासनातील दुसऱ्या क्र मांकाच्या पदावर नियुक्ती के ली. मुख्य सचिवपदासाठी कुंटे व प्रवीण परदेशी यांच्यात चुरस होती. दोघेही भारतीय प्रशासकीय सेवेच्या एकाच तुकडीतील अधिकारी असले तरी स्पर्धा परीक्षेत परदेशी यांचा क्रमांक वरचा होता.
परदेशी ज्येष्ठ असले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कु ंटे यांच्या नावाला पसंती दिली. कु ंटे हे नोव्हेंबर अखेर निवृत्त होणार असल्याने त्यांना मुख्य सचिवपदी नऊ महिन्यांचा कालावधी मिळेल.
रत्नाकर गायकवाड यांनी २०११ ते २०१२ या काळात मुख्य सचिवपद भूषविल्यानंतर सुमारे साडेआठ वर्षानी प्रशासनातील सर्वोच्च पदावर मराठी अधिकाऱ्याची नियुक्ती झाली आहे. कुंटे हे सध्या अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) या पदावर कार्यरत होते. मुंबई महानगरपालिके चे आयुक्त, नियोजन, गृहनिर्माण खात्यांचे सचिवपदही त्यांनी भूषविले आहे. राज्यपालांचे सचिव म्हणूनही त्यांनी काम के ले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 28, 2021 3:07 am