News Flash

मुंबईत कोविड सेंटरजवळ गाडीत म्युझिक लावून जोरदार डान्स सुरु होता आणि तितक्यात…

मध्यरात्रीच्या सुमारास घडली घटना

उपनगरात विलेपार्लेमध्ये करोना केंद्राजवळ धिंगाणा घातल्याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. दोन गाडयांमध्ये मोठया आवाजात म्युझिक सिस्टिम लावून हे सर्वजण रस्त्यावर जोरदार डान्स करत होते. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

रविवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आरोपी हे अंधेरीचे रहिवाशी आहेत. रात्रीच्यावेळी मुंबईत संचारबंदी असूनही ते रस्त्यावर गाडया घेऊन फिरत होते.

हे लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन आहे. आयपीसीच्या विविध कलमातंर्गत त्यांना अटक करण्यात आली होती. नंतर जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2020 12:47 pm

Web Title: six held for dancing to music on road near covid centre in mumbai dmp 82
टॅग : Coronavirus
Next Stories
1 मुंबई : आजपासून ‘या’ पाच स्टेशनसाठी टॅक्सीसेवा, व्हॉट्सअ‍ॅपवर करावी लागणार बुकिंग
2 व्यवहारांना टप्प्याटप्प्याने मुभा
3 आजपासून देशभरात विशेष रेल्वे फेऱ्या
Just Now!
X