24 October 2020

News Flash

राज्यात सहा पोलिसांचा करोना संसर्गाने मृत्यू

मार्च महिन्यापासून आतापर्यंत २२३ अधिकारी, अंमलदारांचा मृत्यू

प्रतिकात्मक छायाचित्र

राज्य पोलीस दलातील करोनाबाधित सहा अधिकारी आणि अंमलदारांचा गेल्या २४ तासांत मृत्यू झाला. त्यात मुंबई, ठाण्याच्या दोन अंमलदारांचा समावेश आहे.

मुंबईतील टिळकनगर पोलीस ठाण्याचे हवालदार अशोक गवारे, ठाण्यातील शीळ डायघर पोलीस ठाण्यातील हवालदार, नाशिक मुख्यालयातील सहायक उपनिरीक्षक बाळू शिंदे, भंडारा जिल्ह्य़ातील जवाहर नगर पोलीस ठाण्याचे हवालदार नाथू सार्वे, सोलापूरचे उपनिरीक्षक शौकत अली शेख आणि गोंदियाचे पोलीस नाईक राजेश दोंदे यांचा करोनाने मृत्यू झाला. पोलीस मुख्यालयाने दिलेल्या माहितीनुसार मार्च महिन्यापासून आतापर्यंत २२३ अधिकारी, अंमलदारांचा मृत्यू झाला. करोनाबाधीत पोलिसांची संख्या २१ हजार ३११ वर पोहोचली. यापैकी १७ हजार ४३४ पोलीस करोनामुक्त झाले. तर तीन हजार ६५५ पोलीस उपचार घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2020 12:44 am

Web Title: six policemen die of corona infection in state abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 विद्यापीठांचे शैक्षणिक वर्ष नोव्हेंबरपासून
2 प्राध्यापक, कर्मचाऱ्यांसाठी १०० टक्के उपस्थिती बंधनकारक नाही
3 मुंबई पोर्टच्या पुनर्विकासातील अडथळे दूर करा
Just Now!
X