20 October 2020

News Flash

धक्कादायक! शिर्डी- मुंबई मार्गावर धावत्या बसमध्ये सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार

मुंबईतील मालाडमध्ये राहणारे दाम्पत्य त्यांच्या दोन लहान मुलांसह तीन दिवसांपूर्वी शिर्डीला गेले होते. १३ जून रोजी रात्री दाम्पत्य लक्झरी बसने मुंबईला परतण्यासाठी निघाले.

संग्रहित छायाचित्र

लहान मुलांवरील अत्याचाराचे सत्र सुरुच असून शिर्डीवरुन मुंबईला परतणाऱ्या दाम्पत्याच्या सहा वर्षांच्या मुलीवर ३२ वर्षांच्या नराधमाने धावत्या बसमध्ये लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सोपान उगले याला अटक केली असून खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसमध्ये ही घटना घडली आहे. सोपान उगले हा ‘बेस्ट’मध्ये चालक म्हणून काम करत असल्याचे समजते.

मुंबईतील मालाडमध्ये राहणारे दाम्पत्य त्यांच्या दोन लहान मुलांसह तीन दिवसांपूर्वी शिर्डीला गेले होते. १३ जून रोजी रात्री दाम्पत्य लक्झरी बसने मुंबईला परतण्यासाठी निघाले. रात्री साडे दहाच्या संगमनेरमधून सोपान उगले बसमध्ये चढला. पीडित मुलगी आणि तिचे कुटुंबीय बसमधून शेवटून दुसऱ्या आसनावर बसले होते. तर सोपान उगले हा शेवटच्या आसनावर बसला होता.

सोपानच्या बाजूचे आसन रिक्त असल्याने महिलेने तिच्या सहा वर्षांच्या मुलीला तिथे बसायला सांगितले. सोपानच्या बाजूला गेल्यावर पीडित मुलगी झोपून गेली. यानंतर सोपानने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पहाटे दाम्पत्य मुंबईत बसमधून उतरल्यावर पीडित मुलीने तिला वेदना होत असल्याचे आईला सांगितले. यानंतर महिलेला मुलीसोबत घडलेला प्रकार लक्षात आला. तिने थेट कुरार पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली. पोलिसांनी पॉस्को अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केली.

गुन्हे शाखेने ट्रॅव्हल्स कंपनीकडून प्रवाशांची यादी मागवली. यात मुलीच्या बाजूला बसलेल्या प्रवाशाचे नाव पोलिसांना समजले. तिकीट नोंदणी करताना उगलेने मोबाईल क्रमांकही दिला होता. या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपी उगले हा बस्टच्या गोरेगाव बस डेपोमध्ये कार्यरत असल्याचे समजते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2018 4:38 am

Web Title: six year old girl assaulted by best bus driver on luxury bus from shirdi to mumbai
Next Stories
1 बी.जे. मेडिकल कॉलेज ७०० कोटींचे कर्करुग्णालय उभारणार!
2 आजपासून एसटी महागली
3 सफाई कामगारांना न्याय मिळवून देणारच – उद्धव ठाकरे
Just Now!
X