नाना चौकमधील स्कायवॉक फक्त शोभेपुरता; रहिवासी आणि दुकानदारांसाठी डोकेदुखी

नाना चौक, गँट्र रोड

Robin Hood thief from Bihar
फक्त स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने करायचा घरफोडी; बिहारच्या ‘रॉबिन हूड’ला केरळमध्ये केलेली चोरी पडली महागात
BMC, 103 aapla dawakhana sunstroke, cold room for Sunstroke, Sets Up 2 Bed Reserves sunstroke, 14 hospitals sunstroke, bmc prepares for sunstroke, mumbai municioal corporation, mumbai news, sunstroke news, balasaheb thackeray aapla dawakhana, marathi news,
उष्माघाताचा सामना करण्यासाठी आपला दवाखानाही सज्ज, १०३ दवाखान्यांमध्ये वातानुकूलनबरोबरच कुलरची व्यवस्था
Traffic Routes Altered as Nashik s CBS to Canada Corner Road Undergoes 18 Month Concreting Work
काँक्रिटीकरणासाठी नाशिकमधील आठ रस्ते बंद – सीबीएस- कॅनडा कॉर्नर मार्गावर एकेरी वाहतूक
North East Mumbai Lok Sabha Constituency Citizens Health Issue
आमचा प्रश्न – ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ : नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न टांगणीला

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए)ने मोठा गाजावाजा करीत दक्षिण मुंबईमधील ग्रॅन्ट रोड परिसरातील सहा रस्त्यांचे संगमस्थळ बनलेल्या नाना चौकात अंडाकृती आकारात उभारलेला स्कायवॉक  रहिवाशांसाठी डोकेदुखी बनला आहे. त्याच वेळी फेरीवाले, गर्दुल्ले आणि रिकामटेकडय़ांसाठी हा स्कायवॉक अड्डा बनू लागला आहे.

गिरगाव, चौपाटी, ऑगस्ट क्रांती मैदान, ताडदेव, ग्रॅन्ट रोड रेल्वे स्थानक आणि ग्रॅन्ट रोड रेल्वे पूलावरुन येणारा असे सहा रस्ते नाना चौकात येऊन मिळतात. त्यामुळे नाना चौकामधून वाहनांची मोठय़ा प्रमाणावर वाहतूक सुरू असते. तसेच पादचाऱ्यांचीही येथे मोठी वर्दळ असते. ही बाब लक्षात घेत एमएमआरडीएने सुमारे ५० कोटी रुपये खर्च करुन नाना चौकात अंडाकृती आकाराचा स्कायवॉक उभा केला. हा स्कायवॉक  ग्रॅन्ट रोड रेल्वे स्थानकाला जोडण्यात आला. नाना चौकातील गोलाकार स्कायवॉकवरुन सहा ठिकाणच्या रस्त्यांवर जाता यावे यासाठी जिने उभारण्यात आले. या स्कायवॉकसाठी चार ठिकाणी सरकते जिने उभारण्याचा मानस होता. मात्र दुकानदारांनी विरोध केल्यामुळे दोन ठिकाणी सरकते जिने उभारण्याचा निर्णय मागे घ्यावा लागला. त्यामुळे या स्कायवॉकवर जाण्या-येण्यासाठी दोन ठिकाणी सरकते जिने बसविण्यात आले आहेत. मात्र यापैकी एक सरकता जिना बंदच आहे, तर दुसरा सरकता जिना अधूनमधून बंद पडतो, अशी पादचाऱ्यांची तक्रार आहे. एमएमआरडीएने देखभालीसाठी हा स्कायवॉक पालिकेच्या ताब्यात दिला आहे.

नाना चौक आणि आसपासच्या परिसरातील रहिवाशी ग्रँट रोड स्थानकात जाण्यासाठी केवळ कार्यालयीन वेळेत सकाळी आणि संध्याकाळी या स्कायवॉकचा वापर करतात. इतर वेळी हा स्काय वॉक निर्मनुष्य असतो. सरकत्या जिन्यांची सुविधा नियमित नसल्यामुळे या स्कायवॉकचा उपयोग होत नाही, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. या स्कायवॉकचे भलेमोठ्ठे खांब नाना चौकात मध्येच उभारण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतुकीच्या नियमनातही अडथळे येतात. परिणामी, ग्रॅन्ट रोड स्थानकाडून नाना चौकात जाण्यापुरता स्कायवॉक उभारण्यात आला असता तर त्याचा वापर होऊ शकला असता. संपूर्ण नाना चौक अडविणारा हा स्कायवॉक डोकेदुखी बनला आहे, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. स्कायवॉकवर जाण्या-येण्यासाठी बसविण्यात आलेला सरकता जिना बंद असून तेथे समाजकंटकांनी अड्डा बनविला आहे. तसेच रात्रीच्या वेळी मद्यपी, गर्दुल्ल्यांचा तेथे वावर असतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी हा स्कायवॉक असुरक्षित बनू लागला आहे.