25 October 2020

News Flash

वसई रेल्वे स्थानकात स्लॅब कोसळून १५ प्रवासी गटारात पडून जखमी

दुर्घटनेत १५ प्रवासी जखमी झाल्याचे समजते

प्रवासी प्लॅटफॉर्मवर बाहेरुन जाणाऱया जिन्यावर चढत असताना शिड्या कोसळून हा अपघात घडला

वसई रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर प्रवाशांच्या भारामुळे स्लॅब कोसळला आणि प्रवासी गटारात पडल्याची घटना घडली. दुर्घटनेत १५ प्रवासी जखमी झाल्याचे समजते. लोअर परेल स्थानकाजवळ एक्स्प्रेस गाडीचा डबा घसरल्याने पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यामुळे वसई रेल्वे स्थानकावर देखील प्रवाशांची गर्दी झाली होती. प्रवासी प्लॅटफॉर्मवर बाहेरुन जाणाऱया जिन्यावर चढत असताना शिड्या कोसळून हा अपघात घडला. संपूर्ण स्लॅब खाली कोसळला आणि प्रवासी खालील असलेल्या मोठ्या गटारात पडले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवीतहानी झालेली नसून, १५ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2016 11:46 am

Web Title: slab collapsed in vasai railway station
टॅग Loksatta,Mumbai News
Next Stories
1 VIDEO: एक्स्प्रेसचा डबा घसरल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
2 खडसेंचा पाय खोलात!
3 दरेकरांच्या उमेदवारीने निष्ठावंत संतापले..
Just Now!
X